आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिनी प्राध्यापकावर किडनी प्रत्यारोपण दिवसाआड डायलिसिस, तरी रोज वर्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - यू गोंगमाओ या शिक्षकाची ही कहाणी आहे. त्यांच्या मेंदूवर व डोळ्यांवर शस्त्रक्रिया झालेली आहे. आता त्यांचे मूत्राशय निकामी होत आहे. स्थिती इतकी गंभीर आहे की एक दिवसाआड डायलिसिस करावे लागते. अशक्तपणामुळे ते फार वेळ उभेही राहू शकत नाहीत.
तरीही ते रोज वुहान विद्यापीठात विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवतात. त्यांच्या वर्गाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यांना मदतीची तयारी दर्शवली आहे. २०१२ मध्ये त्यांच्या मेंदूविकाराचे निदान झाले. मूत्राशयाच्या आजारामुळे त्यांना हा मेंदूचा विकार जडला. यानंतर मेंदू व डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागली. २०१४ मध्ये त्यांना किडनी नेक्रोसिसचा आजार झाला. आता ते हीमोडायलिसिसच्या आधारे जिवंत आहेत. यावर किडनी प्रत्यारोपण शेवटचा उपाय आहे. आता किडनीदात्याचा शोध सुरू आहे. ५ फूट १० इंच उंचीचे गोंगमाओ यांचे वजन चार वर्षांत ९० किलोवरून ५५ किलो झाले आहे. घरीच विश्रांती घ्या, असा डॉक्टरी सल्लाही ते ऐकत नाहीत. गोंगमाओ म्हणतात, वर्गात मला जीवनाचा उद्देश व कारण उमगते. त्यांचा एक विद्यार्थी सांगतो, सरांनी आजवर एकही तास बुडवला नाही. गोंगमाओ यांच्याकडे एक खास पेटी आहे. ती विद्यार्थ्यांच्या पत्रांनी भरली आहे. हीच आपली पुंजी असल्याचे गोंगमाओ सांगतात.
ही एकट्याची लढाई नाही...
शिकवण्याची मला आवड आहे. विद्यार्थ्यांवर मी प्रेम करतो, त्यांना शिकवणे मला आवडते. यात मला सहकाऱ्यांचेही प्रोत्साहन मिळते. यामुळे दुर्धर आजाराशी मी एकटा लढतो आहे, असे मला कधीच वाटले नाही. माझ्यासोबत शेकडो लोक लढत आहेत. जगभरातील माझे विद्यार्थी मला पत्र पाठवतात. या आजारात अशा पत्रांचाही आधार होतो.- यू गोंगमाओ
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, यू गोंगमाओ यांचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...