आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 कोटींचा मालक, 43 लग्झरी कार्स, अशी होती या योगगुरुची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉट योगा शिकवताना विक्रम चौधरी - Divya Marathi
हॉट योगा शिकवताना विक्रम चौधरी
इंटरनॅशनल डेस्क- जगभरात हॉट योगा सेंटर चेन चालवणारा योगगुरु विक्रम चौधरी पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. आपल्या सहकारी महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी त्याची सर्व प्रॉपर्टी जप्त केली आहे. दरम्यान, कोर्टाचा निर्णय समजताच विक्रम फरार झाला आहे. विक्रम आताही विक्रम योगा स्टूडियोजच्या 700 हून अधिक फ्रॅंचायजीचा मालक आहे. त्याची एकून संपत्ती सुमारे 500 कोटीहून अधिक आहे. कायमच वादग्रस्त राहिला विक्रम...
 
- 70 वर्षीय भारतीय अमेरिकन विक्रम चौधरी 'विक्रम योग'चा संस्थापक आहे. तो संपूर्ण जगात हॉट योग गुरु नावाने प्रसिद्ध आहे.
- 220 देशात त्याचे 720 योग सेंटर आहे, जेथे विक्रम योगा शिकवला जातो. एकट्या ब्रिटनमध्ये अनेक सेंटर आहेत. 
- त्याच्या फॉलोअर्समध्ये मॅडोना, डेमी मूर, बिल क्लिंटनची मुलगी चेल्सी क्लिंटन आणि जॉर्ज क्लूनी यासारखे अनेक हॉलिवूड, खेळ आणि पॉलिटिक्सच्या जगतातील हाय प्रोफाईल सेलिब्रिटीज सहभागी आहेत.
- विक्रमवर सेक्शुअल हॅरेसमेंटचे आरोप नेहमीच होत आले आहेत.
- सन 2013 मध्ये त्याची वकिल मीनाक्षीसह सहा महिलांनी योग गुरु विक्रमवर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप केला होता. 
- तर, विक्रमने एका इंटरव्यूमध्ये म्हटले होते की, त्याच महिला माझ्यावर प्रेम करतात. मी कोणावरही कधीही बळजबरी केली नाही.
 
पत्नीला दिलाय घटस्फोट- 
 
- त्याची पत्नी राजश्री सुद्धा फेमस योगा टीचर आहे, जिने विक्रमवर रेपचे आरोप झाल्यानंतर वैतागून घटस्फोटासाठी अर्ज केला होता.  
- 32 वर्षाच्या लग्नानंतर राजश्री चौधरीने डिसेंबर 2015 मध्ये विक्रम चौधरीविरूद्ध घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
- राजश्रीने विक्रमच्या 500 कोटीच्या प्रॉपर्टीतील आपला निम्मा हिस्सा मागितला होता.
- अखेर एप्रिल 2015 मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला. राजश्रीला पोटगी म्हणून बेवरली हिल्स आणि लॉस एंजिलिसचे घर सोबतच फेरारी, मर्सिडीज 550 आणि बेन्टले कार दिल्या गेल्याचे सांगितले गेले.  
- तसेच यानंतर राजश्री विक्रम चौधरीवर कोणताही खटला दाखल करणार नाही, अशी त्यांच्यात तडजोड झाली.
- विक्रम आणि राजश्री यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. 
- विक्रमजवळ 720 पेक्षा अधिक योगा स्कूलसोबतच बेवरली हिल्स, लॉस एंजिलिस आणि होनोलुलूमध्ये प्रॉपर्टीज आहेत.
- यासोबतच त्याच्याकडे 43 लग्झरी कार्सचा अलिशान ताफा आहे, ज्यात रॉल्स रॉयस आणि बेन्टले सारख्या कार्स आहेत.
- सध्या, विक्रम अमेरिका सोडून भारतात परतला असून त्याने लोणावळ्यात आपले बस्तान बसवल्याचे बोलले जाते.
 
काय आहे विक्रम योग?
 
- विक्रम चौधरी आपल्या फॉलोअर्सना 40 डिग्री सेल्सियस तापमानात योगा शिकवतात. तो याला 'हॉट योग' म्हणतो.
- त्याच्याजवळ वर्ल्डवाईड 650 स्टूडियोत हजारों फॉलोअर्स आहेत. 
- फोर्ब्सच्या माहितीनुसार, विक्रम एका ट्रेनिंग सेशनला 10 हजार डॉलर तर पर्सनल ट्रेनिंगसाठी 20 हजार डॉलर घेतो.
- विक्रम ऑक्टोबर 2015 मध्ये कॉपीराईट केस हारला होता. यात 26 पोज आणि तीन ब्रीथ एक्सरसाईजचा समावेश होता.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...