आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखवीवरील भूमिका सत्यावर आधारित, चीन संयुक्त राष्ट्रात घेतली होती पाकिस्तानची बाजू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर-रहमान लखवीच्या सुटका करणा-या पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याच्या भारताच्या भूमिकेला विरोध करण्यास तथ्याचा आधार आहे. म्हणूनच भूमिकेमागे स्वच्छ हेतू व आधार आहे, असे चीनने गुरूवारी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानवर कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली होती. त्याच्या विरोधात चीनने जाहीर भूमिका घेऊन पाकिस्तानची उघडपणे बाजू घेतली होती. त्यानंतर चीनचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आला होता. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य या नात्याने चीनने आतापर्यंत १२६७ प्रकरणात नेहमीच स्वच्छ हेतू आणि ठोस पुराव्यानंतरच मतप्रदर्शन केले आहे, असे हुआ चुनयिंग म्हणाल्या. ब्रिक्सच्या निमित्ताने माेदी-शी चर्चा अतिशय रचनात्मक स्वरूपाची होती. एकूणच भारत आणि चीन यांच्यातील संवाद चांगल्या पातळीवर सुरू असल्याचा दावाही चीनने केला आहे.

लष्कराचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा थिंक टँकची स्थापना
चीनने पहिल्यांदाच राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवर सखोल अभ्यास करता यावा म्हणून करण्यासाठी थिंक टँकची स्थापना केली. त्यासाठी संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. हे केंद्र केंद्र सरकारचे सुरक्षेच्या क्षेत्रातील सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. लष्कर आणि नागरी पातळीवरील उपलब्ध स्त्रोत यांचा समन्वय साधून सल्लागाराचे महत्वाचे काम त्याद्वारे करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...