आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी विद्यापीठात लठ्ठपणा कमी करण्याचे धडे; 7 टक्के गुण मिळवा आणि उत्तीर्ण व्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- विद्यार्थ्यांमधील स्थूलपणा कमी करण्याची समस्या अनेक देशांत पाहायला मिळते. चीनने त्यावर अजब शक्कल लढवली आहे. लठ्ठ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना गुणांची कमाईदेखील करता येणार आहे.  

विद्यार्थ्यांना तंदुरुस्त व आहाराविषयी जागरूक करण्यासाठी नानजिंग कृषी विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लठ्ठ मुला-मुलींनी आहारावर नियंत्रण केल्याचे आणि व्यायामावर भर दिला जात असल्याचे दाखवून दिल्यास त्याबद्दल त्यांना गुण मिळणार आहेत. अर्थात प्रात्यक्षिकावर या अभ्यासक्रमात जास्त भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी व्यायामासाठी वेळ काढून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी हा अभ्यासक्रम अधिक फायद्याचा ठरणार आहे.  

७ टक्के गुण मिळवा आणि  अभ्यासक्रमात उत्तीर्ण व्हा  
विद्यार्थ्यांना वजन कमी करण्याचे केवळ पुस्तकी ज्ञान देऊन भागणार आहे. त्यांना व्यायामाची गोडी लागून त्यांनी आपल्या वजनातील ७ टक्के वजन अभ्यासक्रम पूर्ण करताना कमी करू दाखवल्यास त्यांना या परीक्षेत उत्तीर्ण केले जाणार आहे, असे झोऊ कॅनफू यांनी सांगितले. अभ्यासक्रम चालवण्याची जबाबदारी कॅनफू यांच्यावर आहे.  

अॅप्सचा सदुपयोग 
दररोजच्या भोजनात काही त्रुटी राहून जाऊ नयेत. म्हणून ते खाण्यापूर्वी खाद्यपदार्थांचा फोटो काढून तो अॅप्सद्वारे पोषक आहारतज्ज्ञाकडे पाठवतात. २०१३ आणि २०१४ दरम्यान झालेल्या पाहणीत संस्थेतील १३ टक्के विद्यार्थी स्थूलतेने ग्रस्त होते. हा अभ्यासक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे लाभदायी ठरेल, असा विश्वास विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे.  
 
मुले दहा किमी चालू लागली, व्यायामशाळेतही वेळ देऊ लागली  
विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वजन कमी करण्यासाठी नव्या अभ्यासक्रमाची संधी दिली आहे. त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटले असावे. त्यामुळेच आता लठ्ठ विद्यार्थी किमान १० किमी चालू लागले आहेत. व्यायामशाळेतही त्यांचा बराचवेळ जात आहे, असा दावा विद्यापीठाच्या अध्यापकांनी केला आहे. दर बुधवारी दुपारी ही मुले गिर्यारोहण करतात. 
बातम्या आणखी आहेत...