आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील तरूणाईला जोडीदार मिळेना, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड भाड्याने घेण्याचे फॅड जोरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये आजच्या घडीला किमान 18 कोटी तरुण-तरुणी सिंगल आहेत. यातील बहुतेक उच्चशिक्षित, वर्किंग व सिंगल राहणारे आहेत. - Divya Marathi
चीनमध्ये आजच्या घडीला किमान 18 कोटी तरुण-तरुणी सिंगल आहेत. यातील बहुतेक उच्चशिक्षित, वर्किंग व सिंगल राहणारे आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- चीनमध्ये मागील तीन-चार वर्षापासून एक नवा ट्रेंड आला आहे. तेथील युवक-युवती लग्नाच्या कटकटीपासून वाचण्यासाठी व आई-वडिलांच्या प्रश्नांपासून सुटका करून घेण्यासाठी भाड्याने गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंड घेण्याचा ट्रेंड आला आहे. चीनमधील एका ब्लॉगरने यावर अनुभव शेयर केला आहे.
 
चीनमध्ये आजच्या घडीला किमान 18 कोटी तरुण-तरुणी सिंगल आहेत. यातील बहुतेक उच्चशिक्षित, वर्किंग व सिंगल राहणारे आहेत. 

चीनमधील एका ऑनलाइन सेल्स फर्मने युवतींना भाड्याने बॉयफ्रेंड देण्याची अनोखी सेवा सुरु झाल्या आहेत. चीनमध्ये सिंगल राहणा-या मुलींसाठी, खासकरून बॉयफ्रेंडबाबत चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागणा-या मुली व अविवाहित महिलांची गरज लक्षात घेऊन ही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. चीनी नववर्षाच्या दिवशी लाखो चीनी युवक-युवती या अनोख्या सेवेचा लाभ घेतात. 
 
चीनी नव वर्षाच्या निमित्ताने चीनमधील लोक एकमेंकांना व कुटुंबियांतील सदस्यांना भेटून आनंद साजरा करतात. यावेळी सिंगल आणि वर्किंग मुलींना डिनर टेबलवर आपले आई-वडिल अथवा नातेवाईक प्रश्न विचारतात की, काय तुला कोणी बॉयफ्रेंड मिळाला?. या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी ज्यांना आतापर्यंत मिस्टर किंवा मिस्ट्रेस मिळाला नाही ते लोक भाड्याने गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड घेत असतात. जेणेकरून त्यांना त्यांच्या नातेवाईकांपुढे किमान कमीपणा वाटणार नाही. खास महिलांसाठी सुरु असलेल्या 'ताओबाओ डॉट कॉम' वर भाड्याने बॉयफ्रेंडशी संबंधित 260 पेक्षा जास्त सेवा उपलब्ध आहेत व रोज सेवांची संख्या वाढत चालली आहे.
 
प्लास्टिक इंडस्ट्रीत सेल्समन असलेला दिंग हुई (27) हा युवक गेल्या वर्षात दोन वेळा भाड्याने बॉयफ्रेंड म्हणून गेला आहे. एकदा स्प्रिंग फेस्टीवल आणि दुस-यांदा नॅशनल डेच्या वेळी. दोन्हीही वेळेस त्याला 28 वर्षीय युवतींनी भाड्याने नेले होते. त्याची एकदा भाड्याने जाण्यासाठी 500 डॉलर फी आहे. उच्चाभ्रू युवक-युवतींची फी आता हजार-दोन हजार डॉलर्सच्या घरात पोहचली आहे. याचबरोबर त्याला घेऊन जाण्यासाठी तिकीटाचे पैसे, कपडे व खाणे-पिणे या सर्व गोष्टींचा खर्च संबंधित युवतींनी केला होता. दिंगचे म्हणणे आहे की, मलाही कोणी गर्लफ्रेंड नाही. त्यामुळे मी एकटाच असतो व बोर होतो त्यामुळे मी अशी कामे करतो.
 
70 टक्के चीनी लग्नापूर्वीच सेक्समध्ये अडकतात- 
 
- चीनमधील एका मॅगझीनने केलेल्या पाहणीत आढळून आले होते की, चीनमधील सुमारे 70 टक्के युवा-युवती लग्नाआधीच सेक्स करतात. 
- शियाओकांग नावाच्या मॅगझीनच्या पाहणीवरून 'व्हॉंट चायना टाईम्स' वृत्तमानपत्रात बातमी आली होती. 
- मॅगझीनने 31 प्रांतात 20 ते 39 या वयोगटातील युवकांचा सर्वे केला आहे. चीनमध्ये प्री-मॅरिटल सेक्स करणा-यांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. 
- 1969 मध्ये 15 टक्के तर, 1994 मध्ये सुमारे 40 टक्के युवक प्री-मॅरिटल सेक्स करत होते.  
 
समाजशास्त्रज्ञ विरोधात-
 
- बीजिंगमधील नॉर्मल विद्यापीठातील मानसशास्त्र विभागातील प्राध्यापक लिन शियून यांच्यामध्ये भाड्याने बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड देणे बरोबर नाही. 
- भाड्याने बॉयफ्रेंड नेल्यानंतर घरातील मंडळीनी लग्नाबाबत विचारल्यानंतर अशा जोडप्याकडे त्याची उत्तरे नसतील.
- कदाचित तसे कधीच होणार नसल्याने कालातरांने संबंधित युवक-युवतीच्या घरातील मंडळी आणखी नाराज व दु:खी होतील.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, चीनमधील या अनोख्या फॅडबाबत...