आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lover Of Married Women Spend Night On Ledge After Her Husband Return To Home

वेळेपूर्वी घरी आला नवरा, प्रियकराने सातव्या मजल्याच्या सज्जावर काढाली रात्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुजियान - चीनमध्ये एका प्रियकराला रात्रभर एका इमारतीच्या सातव्या मजल्या खिडकीबाहेरील सज्जावर रात्र काढावी लागली. ही घटना चीनच्या फुजियाना प्रांतातील शिशी येथील आहे. याठिकाणी एक तरुण प्रियकर त्याच्या प्रेयसीकडे आला होता. त्यावेळी प्रेयसीचा पतीन बिझनेस टूरसाठी बाहेरगावी गेला होता. पण तो वेळेपूर्वीच परतल्याने या प्रेमी युगूलाची पंचाइत झाली. त्यामुळे लपण्यासाठी प्रियकर खिडकीबाहेर सज्जावर जाऊन बसला. त्यानंतर त्या तरुणाला रात्रभर त्या सज्जावरच राहावे लागले.

दुसऱ्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यानंतर या चीटर वाइफने रेस्क्यू सर्व्हीसला कॉल केला त्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडला त्याठिकाणाहून काढण्यात आले. सुरुवातीला या तरुणाने तो याठिकाणी कसा आला हे त्याला माहितीच नसल्याचे सांगत होता. पण नंतर त्याच्या प्रेयसीनेच सर्व काही मान्य केले. तो बॉयफ्रेंड असून तिनेच त्याला रात्री घरी बोलावले होते हेही तिने सांगितले.

फायरब्रिगेडच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार तो तरुण दारू प्यायलेला होता. त्यामुळेच तो रात्री खिडकीतून उडी मारून त्याठिकाणी लपला. पण सकाळी त्याला परत वर येता येइना तेव्हा त्याला मूर्खपणाची जाणीव झाली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित PHOTOS