आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

35 हॉटेल, एक अख्खी सबमरीन; आतून असे आहे समुद्रावर तंरगणारे शहर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - हाँगकाँगच्या जेन्तिंग कंपनीने नुकतेच आपले आलीशान क्रूज शिप लॉन्च केले आहे. थाटात पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात या जहाजाला वर्ल्ड ड्रीम असे नाव देण्यात आले आहे. तब्बल 335 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद असलेल्या या क्रूझ शिपमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आधुनिक जगातील सर्वच सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या क्रूझमध्ये प्रवास करणाऱ्या आणि राहणाऱ्यांसाठी 75 टक्के खोल्यांना सी व्ह्यू देण्यात आला आहे. आपल्या खोलीत बसूनही प्रवाशी समुद्राचे नजारे पाहू शकतील. या आलीशान जहाजात चक्क 35 रेस्टॉरंट आणि बार आहेत. एवढेच नव्हे, तर या जहाजात एक अख्खी डीप वॉटर सबमरीन सुद्धा लावण्यात आली आहे. यातील प्रवाश्यांना या सबमरीनमध्ये जाऊन समुद्रात 200 मीटर खोलवरचा नजारा पाहता येणार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, समुद्रात तरंगणाऱ्या या आलीशान शहराचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...