बीजिंग - चीनमध्ये एका अवलियाला त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याच्या आणि तिच्या मृतदेहाबरोबर सेल्फी काढून तो सोशल मिडियावर पोस्ट करण्याच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली आहे. ही घटना दक्षिण चीनच्या नॅनिंगमधील आहे. मृत तरुणीचे नाव लीन असल्याची माहिती मिळाली आहे.
ब्रिटिश न्यूज साइट मिररच्या माहितीनुसार आरोपी किन याचे त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर त्याने लिनची हत्या केली. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडच्या मृतदेहाबरोबर सेल्फी काढला आणि सोशल मिडियावर पोस्ट केला. त्याने फोटोखाली 'मला माफ कर, सेल्फिश लव्ह,' असे कॅप्शनही लिहिले. ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे. चीनमध्ये हजारो यूझर्स ती शेअर करत आहेत. सोशल मिडियावर फोटो समोर आल्यानंतर साऊथ चीनमधील वुझोऊ पोलिस किनला शोधायला लागले आणि सुमारे नऊ तासांनंतर त्याला अटक करण्यात आली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS