Home | International | China | Man Proposes Girlfriend With 25 Brand New IPhone Xs

प्रपोज करण्यासाठी खरेदी केले 20 लाखांचे iPhone X, पाहुण्यांना दिले फुकट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 13, 2017, 11:54 AM IST

चीनमध्ये एक युवक आपल्या गर्लफ्रेंड प्रपोज करताच जगभरात व्हायरल झाला.

 • Man Proposes Girlfriend With 25 Brand New IPhone Xs
  इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये एक युवक आपल्या गर्लफ्रेंड प्रपोज करताच जगभरात व्हायरल झाला. व्हिडिओ गेम डिझायनर चेन मिंग याची प्रपोज करण्याची शैली सुद्धा तेवढीच युनिक होती. अॅपल कंपनीचे जे एक iPhone X विकत घेण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली आहेत. त्याने तेच अत्याधुनिक आयफोन एक्सचे 25 नग खरेदी केले. तसेच या 25 iPhone X चा हर्ट शेप तयार करून गर्लफ्रेंडला लग्नासाठी विचारले. एवढ्या अनोख्या प्रस्तावाला ती नकार देऊच शकली नाही. चीनमध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा या प्रपोजलचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
  मित्र-मैत्रिणींना दिला आयफोन...
  - व्हिडिओ गेम डिझायनर चेन मिंगने 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अधिकृत लॉन्चिंगपूर्वी 25 iPhone X बुक केले होते.
  - फोनची डिलिव्हरी झाल्यानंतर त्याने आपल्या मित्राच्या मदतीने प्रपोज करण्याची तयारी सुरू केली. यात चेन मिंगने खास
  ठिकाणी गर्लफ्रेंडला बोलावून लाल गुलाबांवर आयफोनने हर्ट शेप बनवला. तसेच या शेपमध्ये गर्लफ्रेंडसाठीचे गिफ्ट ठेवले.
  - चेनने त्या ठिकाणी आपल्या गर्लफ्रेंडच्या मैत्रिणींना देखील त्या ठिकाणी बोलावले होते. या आयोजनाची तिला काहीच माहिती नव्हती.
  - गर्लफ्रेंड त्या ठिकाणी पोहोचताच चेन गुडघ्यांवर बसला आणि तिला प्रपोज केले. सरप्राइझ आणि त्या ठिकाणी केलेले आयोजन आपल्यासाठी इतकं कुणी करत असल्याचे पाहता ती नकार देऊ शकली नाही.
  - आपल्याला आणि गर्लफ्रेंडला मोबाईल व्हिडिओ गेम खूप आवडतात. त्यामुळेच, आयफोन एक्स मोबाईल निवडला असे तो सांगतो.
  - दोन वर्षांपूर्वी या दोघांची भेट देखील मोबाइल गेममुळेच झाली. दोघांनी मिळून एक मोबाईल गेम तयार केला होता. यानंतर त्या दोघांनी आपला आनंद साजरा करताना तेथे जमलेल्या मित्र-मंडळीला एक-एक आयफोन एक्स भेट म्हणून दिला.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

 • Man Proposes Girlfriend With 25 Brand New IPhone Xs
 • Man Proposes Girlfriend With 25 Brand New IPhone Xs
 • Man Proposes Girlfriend With 25 Brand New IPhone Xs
 • Man Proposes Girlfriend With 25 Brand New IPhone Xs
 • Man Proposes Girlfriend With 25 Brand New IPhone Xs

Trending