आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापलेला हात जिवंत राहण्यासाठी जोडला पायाला, महिनाभराने केले प्रत्यारोपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शियांग्या हॉस्पिटलमध्ये झोउ यांच्या पायाला जोडलेला त्यांचाच हात. - Divya Marathi
शियांग्या हॉस्पिटलमध्ये झोउ यांच्या पायाला जोडलेला त्यांचाच हात.
चांगशा - चीनच्या चांगशामध्ये शियांग्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका व्यक्तीचा कापलेला हात पुन्हा जोडण्यासाठी अनोखा कारनामा केला आहे. डॉक्टरांनी मजूर म्हणून काम करणा-या झोउचा कापला गेलेला हात त्याच्या पायाला जोडला. सुमारे 30 दिवस अशा प्रकारे हात जिवंत ठेवण्यात आला. त्यानंतर 10 तासांचे ऑपरेशन केल्यानंतर त्याचा हात मनगटाला पुन्हा जोडण्यात आला.

अपघातात कापला गेला हात
झोउचा हात ब्लेड मशीनवर काम करत असताना कापला गेला होता. त्याला लगेचच चांगशाच्या शियांग्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याची अवस्था पाहून हात सर्जरीद्वारे जोडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हाताची स्थिती अत्यंत बिकट होती. अपघातात हाताचे एवढे नुकसान झाले होते की, त्याला लगेचच मनगटाला जोडणे शक्य नव्हते.

पेशी जिवंत राहणे होते, गरजेचे
डॉक्टर्सच्या मते हाताच्या नसा आणि स्नायू उपचारानंतर थोड्या ठीक झाल्यानंतर हात मनगटाला जोडचा येणार होता. डॉ. तांग यांनी दिलेल्या माहितीनुसार तापमानात कापल्या गेलेल्या बोटांनाही 10 तासांच्या आत आवश्यक तेवढे रक्त मिळणे गरजेचे अशते. जर अधिक काळ त्या अवयवातील रक्ताचे प्रमाण वाढले नाही तर त्यातील पेशी जिवंत ठेवणे अवघड ठरते. त्यामुळे डॉ. तांग आणि त्यांच्या टीमने निर्णय घेत झोउचा हात त्याच्या उडव्या पायाच्या मनगटाला जोडण्याचा निर्णय घेतला.

यशस्वी सर्जरी
सुमारे महिनाभरापेक्षा अधिक काळ झोऊचा हात त्याच्या पायाशी जोडलेला होता. त्यानंतर डॉ. तांग आणि त्यांच्या पथकाने 10 तासांच्या सर्जरीनंतक तो पुन्हा मनगटाला जोडला. डॉ. तांग यांच्या मते, झोउ आता त्याच्या हाताची बोटेही हलवू शकतो. पूर्वीप्रमाणे हाताचा वापर करण्यास मात्र त्याला वेळ लागणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शियांग्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यापूर्वी 2013 मध्येही अशाप्रकारचे यशस्वी ऑपरेशन केले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...