आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड किलो वजन वाहून नेण्याची क्षमता कागदासारख्या दुमडता येणाऱ्या ड्रोनची निर्मिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- कागदासारखे दुमडता येणारे अफलातून ड्रोन चीनमध्ये तयार करण्यात आले आहे. सध्या चीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या चार पंखांच्या छोट्या ड्रोनला हे नवीन ड्रोन उत्तम पर्याय ठरणार आहे. विशेष म्हणजे दुमडल्यानंतर या ड्रोनचा आकार एका ए-४ आकाराइतका होईल.

अहेड-एक्स या कंपनीने हे ड्रोन विमान तयार केले असून येत्या काही दिवसांत ते बाजारात येऊ शकेल. येत्या पाच वर्षांत ते व्यावसायसिक ड्रोनची विक्री ६७.३ अब्ज डॉलरवर जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी ली शियाओयू यांनी म्हटले आहे. सरकारी वृत्तसमूह पीपल्स डेलीनुसार ट्रान्सड्रोन ए-४ नावाने तयार करण्यात आलेल्या या नव्या ड्रोनची रचना अगदी भिन्न असेल.

१.५ किलो वजन वाहून नेण्याची क्षमता
- ट्रान्सड्रोन ए-४ ची दीड किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असून हे ड्रोन नियंत्रित करणारी व्यक्ती सहजपणे ते रवाना करू शकेल.

- स्वयंचलित अँटी जॅमिंग नियंत्रणाची प्रणाली असलेले हे ड्रोन अगदी विपरित परिस्थितीतही सुरक्षित उडू शकेल.
- ड्रोनवर व्यावसायिक कॅमेरेही लावता येतील. ते माेबाईलशी जोडता येतील.