आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आशियात एकच देश दहशतवादाला खतपाणी घालतोय, मोदींंची पाकवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हांगझोऊ (चीन) - 'दक्षिण आशियामध्‍ये केवळ एकच देश दहशतवादाला खतपाणी घालत आहे. जणू दहशतवाद त्‍या राष्ट्राचे धोरणच आहे,’ अशा शब्‍दांत मोदींनी पाकिस्‍तानचे नाव घेता टीका केली. येथे आयोजित 'जी 20' देशांच्या परिषदेमध्‍ये ते बोलत होते.
मोदी म्‍हणाले, काळापैसा लपवणाऱ्या सुरक्षित जागांचा नायनाट व्‍हावा...
- मोदी म्‍हणाले, कर चोरी करून ज्‍या ठिकाणी काळा पैसा लपवल्‍या जातो, असा ठिकांणाचा नायनाट व्‍हावा.
- भ्रष्‍टाचार, काळापैसा आणि कर चोरी थांबवण्‍यासाठी सरकारने झिरो टॉलरेंस धोरणाचा अवलंब करावा.
ब्रिटिश पंतप्रधानाची घेतली भेट
मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा यांची भेट घेतली. या भेटीत त्‍यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले. विशेश म्‍हणजे थेरसा यांनी ते स्‍वीकारले असून, लवकरच भारत दौऱ्यावर येऊ, असे आश्‍वासन त्‍यांनी दिल्‍याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

मोदी नेमके काय म्‍हणाले...
- मोदी म्हणाले, ‘ संपूर्ण जगाला दहशवादी संघटनेचा मोठा धोका आहे.
- काही देश याचा धोरणाचा भाग म्हणून वापर करत आहेत.
- पण, भारताकडे दहशतवादासाठी झिरो टोलरन्सचे धोरण आहे. आमच्यासाठी दहशतवाद हा दहशतवादच आहे, अशा तिखट शब्दांत त्यांनी पाकिस्तानला फटकारले.
- जगाने दहशतवादच्या विरोधात स्वच्छ भूमिका घ्यावी अशी यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.
- जागतिक पातळीवर दहशतवादाची व्याख्या न झाल्याने काही राष्ट्र दुट्टपी भूमिका घेत असतात. त्यातून पूर्णक्षमतेने दहशतवादी संघटना आणि त्यांचे नेटवर्क मोडून काढण्यास जगापुढेच समस्या निर्माण होत आहेत.
- त्यासाठीच भारताने जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात स्पष्ट भूमिका असली पाहिजे याचा पुरस्कार सुरू केला आहे.
बातम्या आणखी आहेत...