आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही गेम शोमध्ये आईपणाच्या प्रसूती वेदना पित्याने अनुभवल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- मुलांना जन्म देताना महिलांना किती वेदना होतात, हे एका महिलेलाच समजू शकते, परंतु चीनमध्ये पुरुषांनी या वेदना अनुभवण्याचा प्रयत्न केला.

महिलांना त्याग आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी चीनमध्ये २० पुरुषांनी स्थानिक टीव्ही वाहिनीच्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. गरोदरपणाच्या काळात बाळाला जन्म देताना महिलेस किती वेदना होतात, हे जाणून घेण्याचा पुरुषांनी प्रयत्न केला. चीनच्या या लाइव्ह टीव्ही शोमध्ये २० पुरुषांनी सहभाग घेतला होता. हे पुरुष लवकरच बाबा होणार आहेत. त्यांना सिम्युलेटिंग लेबरद्वारे प्रसूती वेदनेच्या अवस्थेचा अनुभव करून देण्यात आला. या कार्यक्रमात विजयी झालेला पुरुष ८० इंडेक्सपर्यंतच्या वेदना सहन करू शकला. हा पुरुष व्यवसायाने अग्निशमन दलाचा जवान आहे. आईची महानता दर्शवणे. त्याचबरोबर पुरुषांनी महिलांना जास्तीत जास्त सन्मानजनक वागणूक द्यावी, असा कार्यक्रमाचा उद्देश आहे.