आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi's Social Media India China Relations Make Strong

मोदींचा सोशल मीडिया भारत-चीन संबंध सुदृढ करेल, चिनी विश्‍लेषकांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोशल मीडिया संवाद भारत-चीन संबंधातील अडथळे कमी करेल. दोन्ही देशांतील संवादातील त्रुटी कमी करण्यासाठी याचा सकारात्मक परिणाम होईल, असा निष्कर्ष चीनमधील राजकीय विश्लेषकांनी काढला आहे. परंतु अद्यापही सीमेवरील चिनी घुसखोरीला कोणताही लगाम चीनकडून घातला गेला नाही. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त मोदींनी त्यांचे सीनाे वेबो या चिनी सोशल साइटवर अभीष्टचिंतन केले. यातूनच मोदींची परराष्ट्र नीतीची उच्च मूल्ये दिसून येतात, अशी टिप्पणी शांघाई इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडिजचे संचालक झाआे गानचेंग यांनी केली.

सीनो वेबोवर मोदींचे अनेक फॉलोवर्स आहेत. मोदींच्या पोस्टची येथे चिनी नागरिक आवर्जून दखल घेत असल्याचे ग्लोबल टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. मोदींचा सोशल मीडिया जनसंपर्क केवळ चीनशीच नसून अमेरिका, रशिया, जपानशीदेखील आहे. पंतप्रधान मोदी संपर्काबाबतीत तत्पर व संवादात खुलेपणा आवडणारे व्यक्ती आहेत.