आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi's Sri Lanka Visit Is Internal Intervention, Chinese Allegation

नरेंद्र मोदी यांचा श्रीलंका दौरा म्हणजे श्रीलंकेतील ढवळाढवळ, चीनचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा श्रीलंकेतील जाफना दौरा म्हणजे श्रीलंकेतील ढवळाढवळ असल्याचा आरोप चीनच्या सरकारी मालकीच्या ग्लोबल टाइम्समधून करण्यात आला आहे. मोदी अलीकडेच श्रीलंकेच्या दौ-यावर गेले होते. शांघाय इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे सहायक संशोधक लियु जाँग यी यांच्या लेखामध्ये हा भलताच दावा करण्यात आला आहे. मोदी यांच्या श्रीलंका दौ-याकडे चीनसह अनेक देशांच्या नजरा होत्या. श्रीलंकेकडून चीनच्या एका प्रकल्पाला रोखण्यात आल्याने श्रीलंकेवर भारताचा प्रभाव वाढल्याचे संकेत मिळू लागले आहेत. ताज्या घटनेकडे चीनचे लक्ष वेधले जाणे स्वाभाविकच आहे, असे लेखात नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक छोटा देश वेगवेगळ्या शक्तींमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतो.

मोठ्या देशांतील स्पर्धेचा फायदा घेऊन काही स्वार्थ साधण्याचाही प्रयत्न करत असतात. दुसरीकडे मात्र तामिळी बंडखोरीच्या काळात श्रीलंकेला केवळ चीनने मदत केली होती. इतर देशांनी साथ दिली नव्हती, याची आठवणही करून दिली आहे. तामीळ, मासेमारीचे मुद्दे यावरून भारत-श्रीलंकेतील संबंध खूप चांगले होतील, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे.