आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mom, Newborn And The Supermom Called Confinement Center Service At China

प्रसूतीनंतरच्या देखभालीची घरासारखी सुविधा; चीनमध्ये 'कन्फाइन्मेंट सेंटर्स' लोकप्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- प्रसूतीनंतर सर्वात मोठी काळजी असते ती माता अर्भकाच्या देखभालीची. चीनच्या रुग्णालयांनी आता ही सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. नवमातांसाठी ही उपयुक्त सुविधा आहे. कन्फाइन्मेंट सेंटर्सची निर्मिती यासाठी करण्यात आली. घराप्रमाणेच येथे माता अर्भकाची देखभाल केली जाते. चीनमधील महिलांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

देशात विभक्त कुटुंबांची संख्या अधिक असल्यानेही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरी प्रसूत महिलांची हेळसांड होत असल्यानेच ही संकल्पना राबवण्यात येत आहे. कन्फाइन्मेंट सेंटर सक्षम पर्याय सिद्ध होत आहे. यापूर्वी महिला दोन-तीन महिने घरीच राहून स्वत:ची काळजी घेत. चीनमध्ये या कालावधीला ‘जू युझी’ म्हणतात.

२९ वर्षीय झेंग फेन नुकतेच पिता झाले आहेत. त्यांनी घरी दाई ठेवण्याऐवजी पत्नी मुलाला देखभालीसाठी सेंटरमध्ये ठेवले. त्यांनी २८ दिवसांसाठी १४.८० लाख रुपये मोजले. या पॅकेजमध्ये दिवसातून वेळा जेवण-नाष्टा, दैनंदिन चेकअप, मालिश, मुलाची पूर्ण काळजी, काही इतर उपचार, स्पेशालिस्ट डॉक्टर्सकडून मेडिकल चेकअप यांचा समावेश आहे. यात मातेला अजिबात दगदग होत नाही. एक बटन दाबताच सर्व सुविधा मिळतात. पूर्वी दाई ठेवण्याचा विचार केल्याचे झेंग सांगतात. मात्र, सेंटरमधील सुविधा पाहून त्यांनी आपला निर्णय बदलला. व्यावसायिक पद्धतीने ही यंत्रणा काम करते. शिवाय सर्व स्टाफ तज्ज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले.

तियांजिनच्या एका सेंटरमधील सेल्सपर्सन वांग यू सांगते, ‘अनेक महिला या सेवेवर विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे त्यांना खर्च अतिरिक्त होत असल्याचे वाटत नाही. हाँगकाँग तैवानमध्येदेखील अनेक माता या सेवांची निवड करत आहेत. रुग्णालयातच असल्याने आयत्या वेळी समस्या आली तरीही त्वरित मदत मिळते. माता-बालकाच्या देखभालीशिवाय योग वर्ग, शारीरिक पोषणासारख्या सुविधाही येथे आहेत.