Home »International »China» Most Poisonous Frogs On Earth

PHOTOS : या गोल्डन डार्ट बेडकाचे 1 ग्रॅम विष घेऊ शकते 15 हजार लोकांचे प्राण

दिव्यमराठी वेब टीम | Apr 21, 2017, 16:08 PM IST

  • विषारी बेडूक दाखविताना अधिकारी...
इंटरनॅशनल डेस्क- चीनच्या अधिकाऱ्यांनी एका पार्सलमधील अत्यंत विषारी 10 बेडूक जप्त केले होते. या गोल्डन डार्ट बेडकांचे फक्त 1 ग्रॅम विष 15 हजार लोकांचा जीव घेऊ शकते. हे पार्सल पोलंडहून आले होते. कस्टमच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी हे पार्सल कपडे आणि वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळलेले होते. एक्स-रे मशीनची दिशाभूल करण्याची तांत्रिक व्यवस्था त्यांनी केली होती.
बीजिंगच्या क्वारंटाइन अधिकाऱ्यांनी हे पार्सल पकडले होते. त्यावर ‘कपडे आणि भेट’ असे लिहिले होते. संशय आल्याने पार्सल उघडण्यात आले. त्यात प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये चमकदार रंगांचे बेडूक होते. बीजिंग येथील इन्स्पेक्शन अँड क्वारंटाइन विभागाच्या माहितीनुसार, दोन इंच लांबीचे हे गोल्डन डार्ट बेडूक पृथ्वीवरील सर्वात घातक मानले जाते.
हे बेडूक कोलंबियाच्या प्रशांत महासागराच्या किनाऱ्याजवळील जंगलात आढळते. यापूर्वी सप्टेंबर २०१५ मध्ये हाँगकाँगहून आलेल्या एका पार्सलमधूनही असेच काही बेडूक आले होते. या बेडकाच्या काही प्रजाती धोक्यात आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, गोल्डन डार्ट बेडकांची छायाचित्रे....

Next Article

Recommended