आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mount Everest Shifted Southwest Due To Nepal Earthquake

माऊंट एव्हरेस्टची दिशा बदलली, तीन सेंटीमीटर दक्षिण-पूर्वेकडे सरकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर माऊंट एव्हरेस्ट त्याच्या ठिकाणाहून तीन सेंटी मीटर दक्षिण-पूर्वेकडे सरकला आहे. एप्रिल मध्ये नेपाळमध्ये 7.8 रिक्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले होते. त्याआधी माऊंट एव्हरेस्ट उत्तर-पूर्वेकडे झुकत चालला होता. चीनच्या चीनच्या नॅशनल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्व्हेइंग, मॅपिंग अँड जियोइन्फर्मेशन या संस्थेने हा दावा केला आहे. त्यासोबतच एव्हरेस्टच्या उंचीवर याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावाही चीनने केला आहे.
दरवर्षी चार सेंटीमीटर उत्तर-पूर्वेकडे सरकत होता माऊंट एव्हरेस्ट
एप्रिलमध्ये आलेल्या भूकंपाच्या आधी गेल्या 10 वर्षांमध्ये माऊंट एव्हरेस्ट उत्तर-पूर्वेकडे 40 सेंटीमीटर सरकला होता. या दरम्यान त्याची उंची तीन सेंटीमीटरने वाढली होती.
यूरोपियन रडारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
यूरोपातील सेंटीनेल -1ए रडारच्या सॅटेलाइटने त्यांच्या रिडींगच्या आधारावर तयार केलेल्या अहवालात भूकंपामुळे माऊंट एव्हरेस्टची उंची 2.5 सेंटी मीटर कमी झाल्याचा दावा केला होता. मात्र चीनने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे यूरोपीय रडारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नऊ हजारांपेक्षा जास्त लोक मारले गेले
25 एप्रिल रोजी 7.9 रिक्टर स्केल भूकंपात आणि 12 मे रोजीच्या 7.3 रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने नेपाळमध्ये 9000 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला होता. 21हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.