आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या दहशतवादी संघटनांकडून जागतिक संरक्षणाला धोका, प्रथमच BRICS देशांनीही केले मान्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शियामेन / नवी दिल्ली - चीनचे तटवर्ती शहर शियामेन येथे सोमवारी 9 व्या ब्रिक्स संमेलनाला 5 देशांच्या नेत्यांच्या ग्रुप फोटोने सुरुवात झाली. यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नरेंद्र मोदींचे हस्तांदोलन करून स्वागत केले. मोदींनी समिटच्या प्लेनरी सेशनमध्ये सहभाग घेतला. ते म्हणाले, "शांतता आणि विकासासाठी एकमेकांमध्ये सहकार्य असणे अत्यावश्यक आहे. ब्रिक्स बँकेने कर्ज देण्यास सुरुवात केली. हे विकासाच्या दृष्टीकोनातून पहिले पाऊल ठरले." मोदींपूर्वी शी यांनी प्लेनरी सेशनला संबोधित केले. दोन्ही नेत्यांमध्ये मंगळवारी भेट आणि थेट चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, ब्रिक्सच्या डिक्लेरेशनमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांचा उल्लेख आणि त्यापासून असलेल्या धोक्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
 
 
पाककडून जगाला धोका, ब्रिक्स देशांनीही केले मान्य
- ब्रिक्स देशांकडून जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, "आम्ही तालिबान, लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, तहरीक-ए-तालिबान, हक्कानी नेटवर्क, आयएआयएस, हिज्ब उत-तहरीर, अलकायदा, ईस्टर्न तुर्कस्तान इस्लामिक मूवमेंट आणि उज्बेकिस्तानच्या इस्लामिक मूवमेंटकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला जात आहे. त्यामुळे, सर्वच देशांमध्ये सुरक्षा मोठ्या चिंतेचा विषय ठरत आहे." 
- "आम्ही दहशतवादाच्या सर्वच स्वरुपांचा ज्यामध्ये अमली पदार्थ तस्करी, हवाला आणि जगभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसह ब्रिक्स देशांत झालेल्या हल्ल्यांचा निषेध करतो. आम्ही उत्तर कोरियाकडून झालेल्या अण्वस्त्र चाचणीतचा सुद्धा तीव्र निषेध करत आहोत." 
- डिक्लरेशनमध्ये हे सुद्धा मांडण्यात आले, की ब्रिक्स सदस्य राष्ट्र दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि त्यांना होणारे वित्तपोषण रोखण्यासाठी व्यापक धोरण अवलंबणार आहेत. 
 
 
काय म्हणाले मोदी?
- मोदी म्हणाले, "ब्रिक्सने सहकार्य वाढवण्यासाठी मजबूत पायाभूत विकास केला आहे. आपल्याला अनिश्चिततेकडे वाहत चाललेल्या जगात स्थैर्य आणि विकास घडवून आणण्यासाठी योगदान द्यावे लागणार आहे. ते केवळ एकमेकांना सहकार्य करूनच शक्य होईल. एक शक्तीशाली ब्रिक्स सहयोग आणि नाविन्य विकासाचे माध्यम होऊ शकते. शांतता आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणे अत्यावश्यक आहे."
- "सोलार एनर्जी एजंडा बळकट करण्यासाठी ब्रिक्स देश आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा आघाची (ISA) सोबत काम करू शकतात. आमची मोहिम दारिद्री मिटवणे, आरोग्य, स्वच्छता आणि स्किलसह, खाद्य संरक्षण आणि स्त्री-पुरुष समानता आहे."
 
 
'भारत माता की जय' च्या घोषणा
- सोमवारी समिटसाठी कार्यक्रमस्थळी पोहोचणारे मोदी तिसरे जागतिक नेते ठरले. त्यांच्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन कार्यक्रमात पोहोचले. समिटमध्ये सहभागी होण्यासाठी मोदी रविवारीच चीनमध्ये दाखल झाले होते. त्यांनी रविवारी रात्री भारतीय समुदायाची भेट घेतली. त्यावेळी भारत माता की जय च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. भारत मातेचा जयघोषसह मोदी-मोदीच्या घोषणांनी सुद्धा परिसर दणाणला होता. 
- तत्पूर्वी मुसळधार पावसामुळे मोदींचा विमानतळावरील स्वागत सोहळा रद्द करावा लागला. 3 सप्टेंबर पासून होणारे ब्रिक्स संमेलन 5 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.
बातम्या आणखी आहेत...