Home »International »China» Narendra Modi To Chinese Presidents Past Job

मोठ्या पदावर पोहोचण्‍यापूर्वी मोदींपासून ते चिनी अध्‍यक्ष करायचे ही कामे

दिव्यमराठी वेब टीम | Mar 20, 2017, 15:58 PM IST

  • संन्यासी असलेले योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे.
इंटरनॅशनल डेस्क- भारतातील सर्वात मोठे राज्य व जगातील चौथ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाले होते. योगी आदित्यनाथ हे एक संन्यासी आहेत. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी मिळविल्यानंतर धर्माच्या सेवेकरिता स्वत:ला वाहून घेतले. पुढे यातूनच ते केवळ २६ व्या वर्षी गोरखपूरमधून खासदार म्हणून निवडून गेले. १९९८ पासून आतापर्यंत ते गोरखपूरमधून भाजपचे खासदार आहेत. असे असले तरी ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहिले व पुरोगामी विचारवंतांसह विरोध पक्षांच्या निशाण्यावर राहिले. एकीकडे त्यांच्यावर टीका होत राहिली तर दुसरीकडे जनतेत तो लोकप्रिय होत गेले. अखेर त्यांची लोकप्रियता पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले.
यापूर्वीही अनेक देशांतील मोठ्या पदांवरील राजकीय नेत्यांनी ओळख तयार होण्‍यापूर्वी साधारण कामे केली आहेत. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते चिनी अध्‍यक्ष शी जिनपिंग यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच म्यानमारचे अध्‍यक्ष म्हणून हिटिन क्याव यांना निवडले गेले. क्याव यांचे वैशिष्ट्ये हे की, ते देशातील प्रमुख राजकीय नेत्या ऑंग सान स्यू की यांचे पूर्वी वाहनचालक होते.
पुढे स्लाईडद्वारे जाणून घ्या, साधे काम करणारे आज त्या त्या देशांमधील सर्वोच्च नेते आहेत...

Next Article

Recommended