आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला आठवला नेहरूंचा पंचशील सिद्धांत; मोदींना जिनपिंग म्हणाले, तोच पुढे नेऊ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शियामेन / नवी दिल्ली - ब्रिक्स समिटसाठी चीन दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जनपिंग यांची समोरा-समोर भेट घेतली. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेली ही बैठक सकारात्मक ठरल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. मोदींची भेट घेतल्यानंतर शी म्हणाले, "चीन पंचशीलच्या 5 नितींवर भारतासोबत करण्यासाठी तयार आहे." द्विपक्षीय बैठकीत सीमावाद, शांतता आणि द्विपक्षीय व्यापारासह अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. भारत आणि चीनमध्ये पंचशील करार 1954 मध्ये झाला होता. देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चीनसोबत तो करार केला होता. 
 
 
भारत-चीन संबंधांचा आधारे आहे पंचशील
- भारत आणि चीनमध्ये 29 एप्रिल 1954 रोजी हा करार झाला होता. त्यावेळी जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते. चीनच्या तिबेट आणि भारतात व्यापार तसेच परस्पर संबंधांसाठी हा करार झाला होता. 
- या कराराच्या प्रस्तावणेत 5 सिद्धांत मांडण्यात आले होते. जे पुढील 5 वर्षे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या पाठीचा कणा ठरले. यानंतरच हिंदी-चीनी भाई-भाई हे ब्रिदवाक्य प्रचलित झाले आणि भारताने गटनिरपेक्षा भूमिका घेतली. 
- 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे या कराराची भावना दुखावली गेली. 
- पंचशील हा शब्द ऐतिहासिक बौद्ध अभिलेखांमधून घेण्यात आला आहे. हे पंचशील सिद्धांत बौद्ध भिख्खूंच्या वर्तनाशी संबंधित आहेत.
बातम्या आणखी आहेत...