आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Belly Button Challenge नंतर चीनमध्ये आता फिगरसाठी A4 टेस्टची क्रेझ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनचे लोक कधी काय करतील याचा काही नेम काही. फिगरच्या बाबतीतही चीनमधील मुली या खूप काळजी घेत असतात. चीनमधील अनेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या वेळीही मुलींच्या फिगरचा विचार केला जात असल्याचेही यापूर्वी समोर आले आहे. फिगरबाबतच्या या काळजीतूनच काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Belly Button Challenge ची लाट पसरली होती. तर आता चीनमध्ये मुली फिगर मोजण्यासाठी A4 (ए फोर) टेस्ट घेत असल्याचे समोर आले आहे.

अशी आहे A4 टेस्ट
- या टेस्टमध्ये तरुणी फिगर मोजण्यासाठी A4 आकाराच्या कागदाचा वापर करतात.
- हा कागद कमरेसमोर उभा धरला जातो. तरुणींच्या कंबरेचा आकारच त्या कागदापेक्षा जास्त असता कामा नये.
- चीनच्या सोशल मीडिया साइट्सवर सध्या हे चॅलेंज ट्रेडींगमध्ये आहे.
- A4 आकाराच्या कागदाची रुंही ही साधारणपणे 22 सेंटीमीटर असते. म्हणजे तुमची कंबर त्यापेक्षा कमी किंवा तंतोतंत तेवढी असणे हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी गरजेचे आहे.
- चीनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर हे A4 चॅलेंज व्हायरल होत आहे.
- उभ्या धरलेल्या कागदाच्या बाहेर शरिराचा भाग दिसला नाही तर ती व्यक्ती चांगल्या शेपमध्ये आहे असे गृहीत धरले जाते.

काही दिवसांपूर्वी आले होते बेली बटन चॅलेंज
- चीनमध्ये यापूर्वीही फिगरशी संबंधित असे चॅलेंज ट्रंडींगमध्ये राहिलेले आहेत.
- काही दिवसांपूर्वी बेली बटन चॅलेंज ट्रेंडींगमध्ये होते.
- यामध्ये पाठीच्या मागून हात घेऊन तो बेंबीला लावणाऱ्या तरुणींचे फिगर योग्य असल्याचे समजले जात होते.
- त्यावेळीही सोशल मीडियावर अशा फोटोंचा उत आला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, A4 चॅलेंजसाठी चीनमधील मुलींनी शेअर केलेले काही PHOTOS..