आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New York Worker Fired For Making Isis Tattoo On Lips

ओठावर ISIS चे टॅटू गोंदवून घेणे पडले महागात, कंपनीने दिले नारळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: ISIS टॅटू, यामुळे किर्क या तरुणाला नोकरी सोडावी लागली.
न्यूयॉर्क - ओठावर दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या नावाचे टॅटू काढणे पडले महागात. न्यूयॉर्कच्या त्या तरुणाला आपली नोकरी सोडावी लागली आहे. शहराच्या होम डिपो स्टोरमध्‍ये काम करणा-या किर्क सोकर्सोने ओठावर ISIS गोंदवून घेतले होते. मात्र याबाबत तो म्हणतो, की गोंदवून घेण्‍यामागे इसिस ही दहशतवादी संघटना नाही. जवळ-जवळ चार वर्षांपूर्वी इजिप्तच्या एका मुलीबरोबर डेटिंगला गेलो असताना ओठावर आयएसआयएस शब्द टॅटू गोंदवून घेतले. या शब्दाचा 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' असे होतो असे मला माहित नव्हते.
मी दु:खी आहे. मला चांगली नोकरी होती. मला ती परत हवी आहे, असे किर्क असे म्हणतो.
किर्कला टॅटूमुळे नोकरीवरुन काढलेले नाही, असे होम डिपोचे प्रवक्त्याने सांगितले आहे. प्रसिध्‍दी दिलेल्या पत्रकात ते म्हणतात, की खासगी कारणामुळे त्याला कामावरुन काढण्‍यात आले आहे.