आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बौद्ध समुदायालाच नव्हे तर मुस्लिमांनाही छळतो चीन, पाहा कसे जगताहेत life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिनजियांग प्रांतात नमाज पठण करण्‍यापूर्वी आपल्या घराच्या बाहेर तोंड धूताना एक उइगर मुस्लिम. - Divya Marathi
शिनजियांग प्रांतात नमाज पठण करण्‍यापूर्वी आपल्या घराच्या बाहेर तोंड धूताना एक उइगर मुस्लिम.
इंटरनॅशनल डेस्क- हे छायाचित्र जगातील सर्वात मोठ्या बौद्ध विद्यापीठाचे आहे. ते चीनच्या सिचुआन प्रांतात आहे. 3 हजार भिक्खू सुमारे 9 हजार तिबेटी विद्यार्थ्यांना शिकवतात. चीनने दाट लोकसंख्येचा हवाला देत वस्ती रिकामी करण्यास सांगितले आहे. बुलडोझरही लावले आहेत. लंडनच्या फ्री तिबेट ग्रुपचे म्हणणे आहे की, बौद्ध धर्माचा प्रभाव कमी करण्याचा चीनचा इरादा आहे. असे बुलडोझर चीनच्या इतर दाट वस्तीच्या भागावर का चालवले जात नाहीत? मागील 6 महिन्यांत 1500 घरे पाडून 4600 लोकांना हटवले आहे. त्याला युरोपियन संघटनेने (ईयू) आक्षेप घेतला आहे. ईयूचे राजदूत 22 जूनला विद्यापीठात गेले होते. हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. चीनने दलाई लामांशी चर्चा सुरू करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. 
 
मात्र, चीन हा फक्त बौद्ध धर्मातील लोकांना छळते असे नाहीतर इतर अल्पसंख्याक धर्मातील लोकांनाही त्रास देत असते. चीनने तेथे राहत असलेल्या मुस्लिम समुदायावरही बरीच निर्बंध लादले आहेत. चीनमध्‍ये 2 कोटींपेक्षा जास्त मुस्लिम राहतात. या देशात 30 हजारांपेक्षा मशिदी व 10 मुस्लिम वांशिक गट आहेत. यातील एक समुदाय असा आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून सेन्सॉरशीपचा सामना करत आहे. जाणून घ्‍या, कोण आहेत उइगर मुस्लिम...
 
-  उइगर, तुर्कस्तानी मुस्लिम आहेत. शिंजियांग प्रांतात 45 टक्के उइगर मुस्लिमांची लोकसंख्‍या आहे. 
- उइगर मुस्लिम स्वत:ला चीनचे रहिवाशी मानत नाहीत. 
- चीनच्या म्हणण्‍यानुसार, उइगर नेते मुस्लिम बहुल शिंजियांग प्रांतात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत. 
- उइगर मुस्लिम तुर्की भाषा बोलतात. 
- चीनने पाकिस्तानवरच उइगर मुस्लिमांना भडकवल्याचा आरोप करत असते.  
- चिनी सरकारनुसार, पाकिस्तानच्या काही भागात उइगर मुस्लिमांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे.
 
नमाज पठण नाही, दाढी राखू शकत नाही-
 
- 2014 मध्‍ये रमझानच्या वेळी चीन सरकारने उइगर मुस्लिमांना पाच वेळा नमाज पठणावर बंदी घातली होती. याला बराच विरोध झाला. 
- ताइपेकला जगातील सर्वात छोटी टोपी असल्याचे म्हटले जाते. जर एखादी उइगर महिलेने ही टोपी घातल्यास याचा अर्थ होतो ती विवाहित आहे. 
- चीनमध्‍ये उइगर मुस्लिमांना दाढी राखण्‍यास मनाई आहे. उइगर महिलांना बुरखा घालायलाही बंदी आहे. 
- चीन सरकारने 2008 मध्‍ये दाढी ठेवण्‍यावर बंदी घातली होती. कारण दंगे वाढत होते. मात्र आजही असे कित्येक उइगर आहेत जे लांब दाढी ठेवतात. 
- उइगर महिला बुरखा घालून पेट्रोल पंप, स्टेशन, बँक आणि हॉस्पीटलमध्‍ये जाऊ शकत नाही. ती सरकारी नोकरीही करु शकत नाही.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, कसे आहेत उइगर मुस्लिमांचे जगणे...
बातम्या आणखी आहेत...