Home | International | China | News about China

कोरियाला वेसण घालणार; राजदूतावर जबाबदारी; चीनच्या हालचाली

वृत्तसंस्था | Update - Nov 16, 2017, 03:00 AM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आशियाचा दौरा आटोपला असून त्यांच्या तंबीनंतर अखेर चीनने आपला मित्र उत्तर

 • News about China

  बीजिंग- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आशियाचा दौरा आटोपला असून त्यांच्या तंबीनंतर अखेर चीनने आपला मित्र उत्तर कोरियाला लगाम घालण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. लवकरच चीनचे विशेष राजदूत उत्तर कोरियाला रवाना होणार असून हुकूमशहा किम जाेंग उन यांच्या मनसुब्यांना वेसण घालणार आहेत. चिनी सरकारी प्रसारमाध्यमांतून या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.


  राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विशेष दूत म्हणून साँग ताओ शुक्रवारी उत्तर कोरियाला जाणार आहेत. गेल्या महिन्यात सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या काँग्रेसमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ट्रम्प यांच्या पाच दिवसांच्या दौऱ्याचा समारोप झाल्याच्या दुसऱ्या दिवशी चीन सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. या दौऱ्याबद्दलचा तपशील देण्यास मात्र चिनी अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

  व्हायरस अजूनही दडलेला
  अमेरिकेवर उत्तर कोरियातून झालेल्या सायबर हल्ल्यातून अजूनही सरकारी कामकाज बाहेर पडू शकलेले नाही. कारण विशिष्ट व्हायरस अद्यापही संगणक तसेच इंटरनेट प्रणालीत दडून बसलेला आहे. हा धोका कायम असल्याचा इशारा तपास अधिकाऱ्यांनी दिला आहे. हिडन कोब्रा असे हॅकर ग्रुपचे नाव सांगण्यात आले होते.

  जनतेच्या उपेक्षेबद्दल निषेधाचा ठराव
  उत्तर कोरियातील हुकूमशाही राजवटीने शस्त्र स्पर्धेत उतरून सामान्य जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांची कायम उपेक्षा केली आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्राच्या समितीने निषेध केला

Trending