आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रह्मपुत्रा नव्हे, तिबेटमधील नद्यांवर धरणे; चीनच्या सरकारी माध्यमांनी केला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे काम चीनने हाती घेतले आहे. चीनच्या राज्यांजवळील नद्यांवर धरणे बांधण्यावर चीनचा भर आहे. ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहाशी या प्रकल्पांचा संबंध नाही, असे वृत्त चीनच्या अधिकृत वृत्तपत्राने दिले आहे. चीन १००० किमी लांब बोगदा बांधत असून याद्वारे ब्रह्मपुत्रेचा प्रवाह बदलण्यात येईल, अशी टीका गेल्या महिन्यात झाली होती. त्यावर आता अधिकृत वृत्तपत्राने खुलासा प्रकाशित केला आहे. यार्लंग त्सांगपो नावाने धरणांचे विविध प्रकल्प चीन राबवत आहे. यामध्ये जिन्शा, लानकांग, न्यूजीआंग नद्यांचा समावेश असून हे प्रवाह भारताच्या दिशेने जात नाहीत असे चीनच्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.  


द झांगमू डॅम प्रकल्पावर भारताने वर्ष २०१४ मध्ये आक्षेप घेतला होता. हा प्रकल्प अर्धवट सुरू करण्यात आला होता. हे धरण ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहास रोखणारे असल्यामुळे भारताने या प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र या प्रकल्पाची क्षमता केवळ ८६.६ दशलक्ष क्युबिक मीटर असल्याचे चीनने म्हटले आहे. तिबेटमधील जलविद्युत प्रकल्पांवर भारताने अतिरेकी प्रतिक्रिया देऊ नये असे चीनने म्हटले आहे.  

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, तिबेटला चीनशी मैत्री हवी आहे : दलाई लामा...

बातम्या आणखी आहेत...