आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचा जीव वाचवण्यासाठी दोन महिन्यांपासून आहार वाढवते आहे ८ वर्षांची चिमुरडी, वजन वाढून आईस बोन मॅरो देण्यासाठी धडपड!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग-जिआओ हिजुआन केवळ ८ वर्षांची आहे. ती आईला नवजीवन देणार आहे. आपण एकटेच आईचा जीव वाचवू शकू याची तिला जाणीव आहे. म्हणून जिआओ गेल्या दोन महिन्यांपासून नियमित आहारापेक्षा अधिक आहार घेत आहे. कारण, आईला बोन मॅरो देण्यासाठी जिआओचे वजन किमान ३० किलो तरी व्हायला हवे. 
 
वास्तविक जिआओची आई बा लिली यांना ब्लड कॅन्सर (ल्युकेमिया) आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांटनेच लिलीचे प्राण वाचू शकतील, असे डॉक्टरांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबात फक्त जिआओचा बोन मॅरोच आईची जुळला. डॉक्टरांनी ही गोष्ट जिआओला सांगितली. आईचा जीव आता तिच वाचवू शकते, याची जाणीव त्यांनी करून दिली.
 
 जिआओ पण डगमगली नाही. माझा बोन मॅरो बिनधास्त आईला द्या, असे तिने सांगितले. मात्र, यासाठी जिआओचे वजन किमान ३० किलो व्हायला हवे होते. तिचे वजन तुलनेत ६ किलोने कमी होते. दोन महिन्यांपूर्वीची ही स्थिती होती. आता जिआओने वजन ५ किलोने वाढवले आहे. तिला विचारले, की ‘तुला वजन वाढवायला कुणी सांगितले?’ 
 
ती म्हणाली, ‘कुणीच नाही. मी माझ्या मनाने हे करत आहे. मला आईचा जीव वाचवायचा आहे. डॉक्टरांनी माझे वजन कमी असल्याचे सांगितल्यावर मी पप्पांना मला जास्तीचे जेवण देण्यास सांगितले. सुरुवातीला जास्तीचे जेवण केले तर पचत नव्हते. मात्र, थोडा थोड्या वेळाने मी खात राहत होते. 
 
दर दोन तासाला काहीतरी खावे लागेल, असे पप्पा सांगत होते. मी मग यासाठी अलार्म लावून ठेवते. दर दोन तासाला काहीतरी खाते. जंक फूड मला खूप आवडत होते. मात्र, आता ते सोडले. आता मला फक्त १ किलो वजन वाढवायचे आहे. मी आईला वाचवू शकले तर ती कायम माझ्यासोबत राहील...
 
आईला दु:ख होऊ नये म्हणून वाट्टेल ते सहन करेन...
गेल्या १४ फेब्रुवारीला जिआओची बोन मॅरो बायोप्सी झाली. वय कमी असल्याने भूल न देता डॉक्टरांनी सुई तिच्या हाडांत घुसवली. जिआओ सांगते, ‘मला खूप वेदना होत होत्या. मी रडू येऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. आईने माझे रडणे ऐकले तर तिला दु:ख होईल, अशी भीती होती. आईला वाचवण्यासाठी मी काहीही सहन करेन...’
बातम्या आणखी आहेत...