आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद हाच जी-२० परिषदेतील मुख्य मुद्दा, चीनमध्ये बैठकीचे आयोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हँगझोऊ- जगातील सर्व सर्वोच्च नेते आता चीनमधील आठवड्याअखेर होणाऱ्या जी -२० शिखर परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था यासह वाढत्या दहशतवादाच्या मुद्द्यावरील चर्चा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रादेशिक राजकारण, द्विपक्षीय संबंध समस्या, दहशतवादासह इतर संबंधांवर चर्चा होईल. मात्र यात यजमान चीन वादग्रस्त दक्षिण चीन सागराचा वाद येऊन देणार नाही.

ही परीषद सप्टेंबर रोजी चीनच्या पूर्वेकडील या देखण्या शहरात होईल. युरोपातील अनेक शहरात साखळी बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत आहे. इसिसने हे सर्व दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेलाच आव्हान मिळाले आहे.चीनला दक्षिण चीन समुद्राच्या प्रकरणासह भारत, जपान, ब्रिटन आणि युएस आदी देशांचेही प्रश्न आहेत. चीनच्या मुत्सद्देगिरीला आव्हान देणारी ही परिषद असेल. दरम्यान चीनचे अध्यक्ष शी-जिनपिंग हे द्विपक्षीय जी -२० मधील टॉपच्या सर्वनेत्यांशी द्विपक्षीय शिष्टमंडळासह भेट घेतील. त्यात मोदींचाही समावेश असेल. ते चीनमध्ये बहुधा सप्टेंबर रोजी पोहोचतील या शहरात ते ४८ तासच राहातील. त्यांच्या शी -जिनपींग यांच्याबरोबरील भेटीची मुत्सद्दी आखणी करत आहेत. ते ओबामा, शिंझो ऑबे, थेरेसा यांचीही भेट घेतील. दहशतवाद, अणु पुरवठा ग्रुप (एनएसजी ते युएसडी), ४६ दशलक्ष किमतीचा चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉर आणि बलुचिस्तान यावर द्विपक्षाय करार बोलणी मोकळ्या वातावरणात होतील. मोदींना पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत होईल. ते चीनशी आपली बोलणी संवाद कॅरी फॉरवर्ड करु शकतील.आेेबामांसाठी मात्र हा शेवटचा आशिया दौरा असेल आणि ते दक्षिण चीनच्या समुद्र प्रकरणावर बोलतीलच. या प्रकरणात व्हीएतनाम, मलेशिया, फिलिपाईन्स, ब्रुनेई आणि तैवान हे देखील स्पर्धेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...