आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातक डासांविरुद्ध डासांचीच फौज लढेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग: दक्षिण चीनमधील गुआंगडांग प्रांतामध्ये सध्या डासांचे उत्पादन सुरू आहे. येथे यासाठी चक्क एक प्रयोगशाळाच उभारण्यात आली असून आठवड्याला साधारणपणे १० लाख विशेष डासांची निर्मिती केली जात आहे. हे नर डास खास डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांचा नायनाट करण्यासाठी तयार केले जात आहेत.

‘पीपल्स डेली ऑनलाइन’नुसार, गुआंगडांग सायन्स सिटीमध्ये ही प्रयोगशाळा आहे. डासांची उत्पत्ती करणारा हा जगातील सर्वात मोठा कारखाना ठरला आहे. येथे उत्पादित होणारे हे डास दर आठवड्याला डासांमुळे साथरोगांचा प्रसार होत असलेल्या भागात सोडले जातात. हे काम या प्रकल्पाचे संचालक झी झियाँग यांच्या नेतृत्वाखाली केले जाते.
बातम्या आणखी आहेत...