आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक उपग्रहांचे प्रक्षेपण करून भारताने अवकाश स्पर्धा सुरू केली : चिनी माध्यमे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग  -104  उपग्रह एकाच वेळी यशस्वीरीत्या प्रक्षेपित करून भारताने जगात आता नवी स्पर्धा सुरू करवून दिली आहे. चीनपेक्षाही भारताची भरारी उत्तुंग आहे, असे चीनच्या माध्यमांनी म्हटले आहे. अवकाश प्रक्षेपणाच्या व्यावसायिकीकरणाचे युग आता अवतरेल.
 
जगात याला फार मर्यादित बाजार उपलब्ध आहे. कमी किमतीत व्यावसायिक प्रक्षेपण करण्यास भारत तयार असल्याचा संदेशच याद्वारे देण्यात आला आहे, असे चीनने म्हटले आहे. 
 
भारताला जागतिक स्पर्धेत स्थान मिळवून देण्यासाठीच हा पुढाकार घेतला गेला, असे शांघाय अभियांत्रिकी केंद्राचे संचालक झांग योंगे यांनी म्हटले आहे. हे केंद्र मायक्रो सॅटेलाइटची निर्मिती करते.  भारताच्या यशामुळे आता चीनही अधिक वेगाने या तंत्रासाठी काम करेल.
 
स्पर्धेत चीन मागे सरणार नाही, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. चीनपेक्षाही भारताने हे काम अधिक दर्जेदार पद्धतीने केल्याचे झांग योंगे म्हणाले. भारताने मंगळ अभियान आणि सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपणाचा विक्रम करून चीनला मागे सारले आहे. चीनने आता गती वाढवावी असे योंगे म्हणाले.  
 
२०१४ मध्ये भारताने मंगळाच्या कक्षेत यान पाठवून जागतिक पातळीवर चौथे स्थान मिळवले. चीनला मात्र वर्ष २०१२ मध्ये या मोहिमेत पराभव पत्करावा लागला. भारताच्या या मोहिमा यशस्वी असल्या तरी त्याचा प्रभाव कमी काळासाठी आहे, असे चीन सरकारने म्हटले आहे.
 
लष्करी आणि व्यावसायिक रॉकेट निर्मितीत चीन, अमेरिका आणि रशियापेक्षा भारत  मागेच असल्याचे सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. भारताने गेल्या बुधवारी केलेले विक्रमी प्रक्षेपण प्रशंसनीय उपक्रम होता. मात्र तंत्रज्ञानाच्या पातळीवर भारत सरस नाही, असे मत शेनझेन एअरोस्पेस डाँगफनघाँग डेव्हलपमेंट लि. चे व्यवस्थापक शियू लिजून यांनी मांडले.
 
 
बातम्या आणखी आहेत...