आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकांनी वाचवले १२० चिमुकल्यांचे जीव, विद्यार्थ्यांना वादळाने घेरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांसोबत शिक्षिका गाआे हेइयिंग. - Divya Marathi
रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांसोबत शिक्षिका गाआे हेइयिंग.
जियांग्सू (चीन)- गेल्या आठवड्यात चीनमध्ये जोरदार वादळ आले होते. दुपारी २.३० च्या सुमारास जियांग्सू प्रांतातील यांगचेंग शहराला याचा तडाखा बसला. येथील किंडरगार्टनमध्ये (नर्सरी शाळेत) या वेळी १२० विद्यार्थी होते. अचानक वादळाने घेरल्याने सर्वजण गोंधळून गेले. छत उडत होते. अनेक भिंतीही ढासळल्या. या वेळी शाळेत शिक्षिका उपस्थित होत्या. विनाविलंब त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित जागी एकत्र आणले. त्यांनी ढालीप्रमाणे मुलांचे संरक्षण केले.
काही शिक्षिका दरवाजाजवळच उभ्या राहिल्या. मुलांना जराही त्रास होऊ नये यासाठी शिक्षिका जलद गतीने प्रयत्न करीत होत्या. सगळे अकस्मात झाल्याने कुणाला काही सुचेना. तितक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. शाळेतील साहित्यही सर्वत्र विखुरले. अशा वेळी त्यांनी फक्त मुलांच्या संरक्षणाकडे लक्ष दिले. मुलांना जपण्यासाठी शिक्षिका जखमी झाल्या. यादरम्यान पाच मुले जखमी झाली. दोघांची स्थिती गंभीर झाली. वादळाचा वेग कमी होताच शिक्षिका मुलांना घेऊन रुग्णालयाकडे धावल्या. स्वत:च्या जखमांची पर्वा करता त्यांनी मुलांना रुग्णालयात दाखल केले.

हा ग्रामीण परिसर असल्याने मुलांना रुग्णालयात घेऊन जाणेही कठीण होते. येथे रुग्णवाहिकाही नव्हत्या. इतर वाहनेही कमीच. पूर्व चीनमधील या शिक्षिकांच्या धैर्याची तारीफ देशभर सुरू आहे.

जिक्विआआे स्कूलच्या मुख्याध्यापिका झोऊ वेनयान यांना हा प्रसंग आठवला की अश्रू अनावर होतात. शिक्षिकांनी आपली जबाबदारी निभावलीच, शिवाय अत्यंत प्रेमाने त्यांनी मुलांना जपल्याचे झोऊ सांगतात. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या या शिक्षिका त्यांची किती काळजी घेतात हे यातून दिसून आले. काही शिक्षिका अद्याप रुग्णालयात मुलांची देखभाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आपत्ती विषयी माहिती देणाऱ्या मुख्या ध्यापिकेचे छायाचित्र...
बातम्या आणखी आहेत...