आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान्येतील बंडखाेरांशी अामचा संबंध नाही : चीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चिनी लष्कर ईशान्य भारतातील दहशतवाद्यांना मदत करत असल्याच्या आरोपाचा अधिकाऱ्यांनी इन्कार केला आहे. संबंधित आरोप िबनबुडाचे, हास्यास्पद असून दहशतवाद्यांशी संबंध अशक्य असल्याचे सांगण्यात येते.
भारतीय जवानांवर हल्ला करणाऱ्या नॅशनॅलिस्ट सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खापलँड (एनएससीएन-के) या दहशतवादी संघटनेचा पीएलए अधिकाऱ्यांशी संबंध असण्याच्या शक्यतेचा आरोप हास्यास्पद आहे, असे सरकारच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. पीएलए आणि दहशतवाद्यांतील संबंध अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याअाधी भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये पीएलएच्या सांगण्यावरून एनएससीएन-केने केंद्रासोबतचा शस्त्रसंधीचा करार मोडीत काढल्याचे वृत्त आले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आरोपावर प्रतिक्रिया दिली नाही. ईशान्य भारतातील बंडखोरांना चीनची फूस असल्याची मीडियात अफवा असते.