आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोबेल विजेते चिनी नेते शिआबो यांची आठ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे चीनमधील लोकशाही समर्थक नेते ल्यू शिआबो यांची कैदेतून सुटका झाली आहे. त्यांना यकृताचा कर्करोग झाल्याचे निदान मागच्या महिन्यात वैद्यकीय तपासणीतून उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांना वैद्यकीय पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

लोकशाहीविषयक सुधारणांसाठी आंदोलन केल्यामुळे २००९ मध्ये शिआबो यांना चीनमधील तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यांना ११ वर्षांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१० मध्ये शिआबो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र, कैदेत असल्याने त्यांना नोबेल पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही. ओस्लोमध्ये झालेल्या या समारोहातील त्यांच्या अनुपस्थितीमुळे मंचावर त्यांच्यासाठी ठेवलेली खुर्ची रिकामीच ठेवण्यात आली होती. सरकारने तुरुंगात डांबल्यानंतर पुरस्कार मिळवणारे ते जगातील तिसरे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. शिआबो यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या महिन्यात  केलेल्या वैद्यकीय चाचणीत त्यांना यकृताचा कर्करोग असल्याचे उघडकीस आले होते. हा आजार आता अंतिम टप्प्यात असल्यामुळे त्यांची वाचण्याची शक्यता कमीच आहे. चीनच्या लियाओनिंग प्रांतातील शेनयांगच्या रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...