आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका- दक्षिण कोरियाचा एकत्र युद्धसराव, उत्तर कोरियाच्या बॉर्डरवर बॉम्बहल्ले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका-दक्षिण कोरियात सुरु असलेला युद्ध सराव... - Divya Marathi
अमेरिका-दक्षिण कोरियात सुरु असलेला युद्ध सराव...
इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात युद्धाची स्थिती आहे. याचमुळे अमेरिकेने दक्षिण कोरियात मिसाईल डिफेन्स सिस्टिम टर्मिनल हाय एटीट्यूड एरिया डिफेन्स (थाड) तैनात केले आहे. याशिवाय, मागील काही दिवसापासून अमेरिका आणि दक्षिण कोरियात मिलिट्री मॉक ड्रृील सुरु आहे. हे ड्रील उत्तर कोरियाच्या बॉर्डरजवळच सुरु आहे. ज्यात कोरियन बेटावर तणाव वाढत चालला आहे. उत्तर कोरियाने आतापर्यंत केल्या आहेत 5 अणुचाचण्या...
 
- अमेरिका आणि कोरियन पेनिनसुलात तणाव निर्माण झाल्याने उत्तर कोरियाने अणुचाचण्याचा कार्यक्रम राबविण्याचे योजले आहे. हुकुमशहा किम जोंग उन सिविल कायदा मानत नाही.  
- 2017 मध्येच उत्तर कोरियाने तीन मिसाईल चाचण्या यशस्वी केल्या आहेत. उत्तर कोरियाने 2006 पासून आतापर्यंत 5 न्यूक्लियर टेस्ट केल्या आहेत. 
- मार्च, 2017 मध्ये उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानच्या समुद्री क्षेत्रात पडले होते. त्यामुळे उत्तर कोरिया आणि जपान यांच्यातही तणाव वाढला आहे. 
 
उत्तर कोरियात अमेरिकेन सैनिकांच्या मोठ्या तुकड्या तैनात- 
 
- उत्तर कोरियाच्या अणु हल्ल्याच्या ताज्या इशा-यानंतर अमेरिकेने उत्तरेकडे सर्वात मोठी न्यूक्लियर सबमरीन, मोठ्या जहाजाचा ताफा कार्ल विन्सन तैनात केले आहे. उत्तर कोरियात अमेरिकेची आतापर्यंतची ही सर्वात मोठी सैनिकी घेराबंदी आहे.  
- या दरम्यान उत्तर कोरियाने सुद्धा 25 एप्रिल रोजी 85 व्या आर्मी डेच्या निमित्ताने सर्वात मोठा मिलिट्री एक्सरसाईज करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
 
दक्षिण कोरियातील मुलांना दिले जात आहे रासायनिक हल्ल्यापासून वाचण्याचे ट्रेनिंग-
 
- दक्षिण कोरियाने सुद्धा युद्धाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. येथे वॉर मेमोरियलमध्ये शालेय मुले, नागरिकांना रासायनिक आणि जैविक हल्ल्यापासून वाचण्याच्या पद्धती सांगितल्या जात आहेत.
- आपल्या माहितीसाठी हे की, दक्षिण कोरियाची अडीच कोटी लोकसंख्या उत्तर कोरियाच्या सीमेला लागूनच आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, उत्तर कोरियन बॉर्डरवर सुरु असलेली दक्षिण कोरिया-अमेरिकेच्या मिलिट्री मॉक ड्रिलचे 10 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...