आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्बची चाचणी: एक देश आनंदात तर दुसरा टेन्शनमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हायड्रोजन बॉम्बची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे उत्तर कोरियन लोक(वर) खाली धक्का बसलेले जपानचे लोक... - Divya Marathi
हायड्रोजन बॉम्बची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे उत्तर कोरियन लोक(वर) खाली धक्का बसलेले जपानचे लोक...
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिका आणि सहकारी देशांच्या धमकीला भीक न घालता उत्तर कोरिया सातत्याने नव्या नव्या चाचण्या करत आहे. उत्तर कोरियाने आता एक पाऊल पुढे टाकत जगाला घाम फोडला आहे. उत्तर कोरियाने रविवारी सुमारे 100 किलोटन हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला. या चाचणीनंतर उत्तरी हमक्योंग प्रांतातील किजी भागात सुमारे 5.7 आणि 4.6 तीव्रतेचे भूकंपांचे धक्के जाणवले. उत्तर कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सी योनहॉपने याबाबतचे वृत्त दिले आहे. बॉम्बची चाचणी यशस्वी झाल्यानंतर उत्तर कोरियातील लोक आनंद साजरा करताना दिसले तर शेजारी जपानच्या लोकांना धक्का बसला होता. नुकतेच उत्तर कोरियाने एका मिसाईलची चाचणी केली होती जी जपानच्या वरून जात समुद्रात पडले होते. यामुळे जपानचे लोक दहशतीत आले होते. मोठ्या प्रमाणात विंध्वस करण्याची क्षमता आहे या बॉम्बची...
 
- केसीएनएच्या रिपोर्टनुसार, हाय टेक्नोलॉजी आणि हायली कॅपासिटीचा हायड्रोजन बॉम्ब मोठा विंध्वस करण्याची क्षमता ठेवतो. बॉम्बची सर्व उपकरणे उत्तर कोरियात विकसित करण्यात आली आहेत ज्याची ताकद शेकडो किलोटन आहे. 
- रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, किम जोंग-उनने नुकतेच न्यूक्लियर वेपन्स इंस्टीट्यूटचा दौरा केला होता. तसेच तेथे त्याने एका डिवाईसचे इंस्पेक्शन केले होते जे सुपर एक्सप्लोसिव पॉवर वाला एक थर्मोन्यूक्लियर वेपन आहे. 
- उत्तर कोरियाने या वर्षी जुलैमध्ये 2 वेळा ICBM हॉसॉन्ग-14 ची यशस्वी चाचणी केली होती. ज्याच्या रेंजमध्ये अमेरिकेतील बहुतेक भाग येतो. यानंतर कोरियन पेनिनसुला (कोरियन बेटावर) तणाव वाढला आहे. 
 
5 न्यूक्लियर टेस्ट केल्यात उत्तर कोरियाने-
 
- उत्तर कोरियाने 2006, 2009, 2013 आणि 2016 मध्ये न्यूक्लियर बॉम्बची टेस्टिंग केली होती.
- 9 ऑक्टोबर, 2006- पहिल्यांदा जमिनीच्या खालून केली न्यूक्लियर टेस्ट. यूएसपासून एटमी वॉरचा धोका असल्याचे सांगितले होते.
- 25 मे, 2009- दुस-यांदा केली एटमी टेस्ट.
- 13 जून, 2009- उत्तर कोरियाने सांगितले की, ते यूरेनियम एनरिचमेंट करतील. यामुळे न्यूक्लियर वेपन्स आणि प्लूटोनियम बेस्ड रिएक्टर बनविण्याची शक्यता मानली गेली. 
- 11 मे, 2010- न्यूक्लियर फ्यूजन रिएक्टर बनविल्याचा दावा. यानंतर अशी शक्यता बळावली की उत्तर कोरिया जास्त क्षमतेचा बॉम्ब बनवला.
- 13 फेब्रुवारी, 2013- तिस-यांदा न्यूक्लियर टेस्ट केली.
- 10 डिसेंबर, 2015- हुकुमशहा किमचा दावा- हायड्रोजन बॉम्ब बनविण्याची क्षमता विकसित केली. 
- 6 जानेवारी, 2016- हायड्रोजन बॉम्बची टेस्ट केली. 
- सप्टेंबर, 2016- पाचवी एटमी टेस्ट केली. 
- 2006 मध्ये उत्तर कोरियाने पहिली अणुचाचणी केल्यापासून संयुक्त राष्ट्राने कडक आर्थिक व विविध प्रतिबंध लावले आहेत.
- मात्र, किम जोंग उन याला जुमानत नाहीये.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...