आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिस-यांदा पिता बनला कोरियन हुकुमशहा, पाहा किमचे पर्सनल लाईफ PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी री हिच्यासमवेत हुकुमशहा किम.... - Divya Marathi
पत्नी री हिच्यासमवेत हुकुमशहा किम....
प्योंगयांग- उत्तर कोरियन लीडर किम जोंग तिस-यांदा पिता बनला आहे. त्याची पत्नी री सोल जू हिने काही काळापूर्वी एका मुलाला जन्म दिल्याचे वृत्त समोर आले आहे. 2009 मध्ये किमने री सोबत लग्न केले होते. यहे वृत्त तेव्हा धडकले जेव्हा उत्तर कोरियाने जपानच्या वरून नवे बॅलिस्टिक मिसाईलची टेस्ट केली. ज्यावरून सध्या गदारोळ सुरु आहे. नजरबंद होती हुकुमशहाची पत्नी...
 
- हुकुमशहा किमची पत्नी री हिने सहा महिन्यांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे. तिला आधीच मुले होती. 
- दक्षिण कोरियन गुप्तचर अधिका-याच्या हवाल्याने हे वृत्त तेथील योनहेप न्यूज एजन्सीने दिले आहे.  
- फर्स्ट लेडी री मागील सहा महिन्यांपासून नजरबंद आहे. सार्वजनिक ठिकाणी तिचे एकदाही दर्शन झाले नव्हते. तेव्हाच या अफवा होत्या की ती गरोदर असावी.
- दक्षिण कोरियन खासदारांना नॅशनल इंटेलिजन्स सर्विसने सोमवारी याबाबतची माहिती देताना किमच्या पत्नीने फेब्रुवारीत जन्म दिला आहे. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, किमने 2009 मध्ये रीसोबत लग्न केले होते. त्याच वर्षी तिने एका मुलीला जन्म दिला होता. तर, 2013 साली आणखी एक बाळाला तिने जन्म दिला होता. 
- फॉर्मर एनबीए स्टार डेनिस रोडमॅनने 2013 मध्ये उत्तर कोरियातील ट्रिपनंतर परतल्यावर किमला दुसरे बाळ झाल्याचे सांगितले होते. 
- डेनिसने सांगितले होते की, किमच्या मुलीला आपण खेळवले तसेच किम खूपच चांगला पिता आहे.  
- किम आणि त्याच्या फॅमिलीबाबत जगासमोर खूपच कमी माहिती येते. किमचा बर्थडे आणि त्याच्या लग्नाची तारीख याची माहितीही कन्फर्म नसते.
 
हुकुमशहाच्या पत्नीविषयी- 
 
- हुकुमशहा किमची पत्नी री एक खूपच सामान्य कुटुंबातून आलेली आहे. तिचे पिता अॅकेडमिक तर आई डॉक्टर आहे.  
- री 2005 मध्ये एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देशाच्या स्क्वेयडकडून एक चियरगर्ल म्हणून दक्षिण कोरियात गेली होती.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, किमचे पर्सनल लाइफमधील काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...