आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाला US ची धमकी, किम जोंगच्या समर्थनार्थ लाखो लोक रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रम्प यांच्या धमकीनंतर उत्तर कोरियातील लोक राजधानी प्योंग्यांगमध्ये आपला नेता किम जोंग-उनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. - Divya Marathi
ट्रम्प यांच्या धमकीनंतर उत्तर कोरियातील लोक राजधानी प्योंग्यांगमध्ये आपला नेता किम जोंग-उनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले.
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिका आणि उत्तर कोरियात सध्या प्रचंड तणाव आहे. या दोन्ही देशांदरम्यान कधीही युद्ध पेटू शकेल अशी स्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम इल जोंग याला सद्दामहून वाईट अवस्था केली जाईल अशी धमकी दिली आहे. तसेच उत्तर कोरियात एवढे हल्ले केले जातील त्याची कल्पना करू शकणार नाही असा सज्जड इशारा दिला आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या धमकीनंतर उत्तर कोरियातील लोक राजधानी प्योंग्यांगमध्ये आपला नेता किम जोंग-उन याच्या प्रती आदर करण्यासाठी मोठी परेड काढली. हजारोंच्या संख्येने लोकांनी देशांचा झेंडा हातात घेत रस्त्यावर दिसले. आपल्या लीडरला दिले समर्थन.....
 
- अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘फास्ट अॅंड फ्यूरी’ च्या वक्तव्यानंतर हजारोंच्या संख्येने लोक प्योंग्यांगच्या रस्त्या रस्त्यावर दिसले व देश एकत्र असल्याचा संदेश दिला.
- लोकांनी किम-इल सुंग स्क्वेयरवर एकत्र येत मोर्चा काढला. तसेच किम जोंग-उनच्या समर्थनार्थ अनेक प्रोपोगंडा पोस्टर फडकावले.
- हातात झेंडे घेतलेली रॅली आणि परेड करणारे सर्व लोक वर्कर्स क्लासमधील सफेद पांढ-या रंगातील शर्टमध्ये दिसले.
- तर, देशातील इलीट क्लासमध्ये मोडणा-या लोकांनी ब्लॅक ड्रेस घालत परेड पाहिली व टाळ्या वाजवून दाद दिली. 
 
NKorea सतत करतोय मिसाईल टेस्ट-
 
- उत्तर कोरियावर चोहीकडून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संरक्षणाचे निर्बंध असतानाही त्यांनी 5 अण्वस्त्र चाचण्या घेतल्या आहेत. 
- पहिली चाचणी 2006, दुसरी मे 2009, तिसरी फेब्रुवारी 2012, चौथी चाचणी जानेवारी 2016 आणि पाचवी चाचणी सप्टेंबर 2016 मध्ये घेण्यात आली. शेवटच्या चाचणीत अण्वस्त्राची क्षमता तब्बल 20-30 किलोटन असल्याचा दावा करण्यात आला होता. त्या चाचणीला अणुबॉम्ब पेक्षा हजार पटीने घातक अशा हायड्रोजन बॉम्बशी तुलना करण्यात आली. 
- उत्तर कोरियाकडे हे क्षेपणास्त्र अमेरिकापर्यंत धडकावण्यासाठी लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आणि मिसाईलवर वॉरहेड लावण्याचे तंत्रज्ञान नव्हते. तेच तंत्रज्ञान आता विकसित केल्याचा दावा उत्तर कोरिया करत आहे.
- किम जोंग उन सरकारने एक छोटे अण्वस्त्र तयार केले आहे. क्षेपणास्त्राद्वारे याचे प्रक्षेपण करता येते. 
- यापूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शनिवारी सर्वानुमते उ. कोरियावर नवे निर्बंध लादले होते. 
- यामुळे उ. कोरियाची एकतृतीयांश निर्यात खंडित होईल. त्यांना वार्षिक एक अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागेल. प्याँगयांगने या निर्बंधांवर टीका केली असून अमेरिकी भूभागावर हल्ल्याची धमकी दिली.
 
दक्षिण कोरियातील अमेरिकेचा तळ गुआम शस्त्रसज्ज-
 
- अमेरिका गुआममध्ये शस्त्रास्त्र साठा वाढवत आहे, असा आरोप उत्तर कोरियाने केला आहे.
- उत्तर कोरियाने म्हटले आहे की, 8 ऑगस्टच्या सकाळी गुआमच्या चाच्यांनी द. कोरियाच्या वायुक्षेत्रात युद्धसज्जतेसाठी पुन्हा मॅड कॅप कवायती केल्या. 
- त्यांनी आरोप केला की, अमेरिका गुआममध्ये क्षेपणास्त्र साठा वाढवत आहे. उ. कोरिया गुआमच्या आसपास मध्यम ते लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र रॉकेट हुसोंग-12 च्या प्रक्षेपणाची तयारी करत असल्याचेही गोपनीय सूत्रांकडून कळते. 
- गुआम येथे अमेरिकेचे अँडरसन वायू स्थानक आहे. अण्वस्त्र क्षमतेचे बी-1 बी बॉम्ब वर्षाव करण्यासाठी ते सज्ज आहे. मंगळवारी कोरियाच्या द्वीपकल्पात अमेरिकेने हे पुन्हा पाठवले असल्याचेही वृत्त आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...