आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅराग्वे राष्ट्राध्यक्षांना निवडणूक लढवण्यास संसदेने केली मनाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅसंशन- लॅटिन अमेरिकेतील देश पॅराग्वेच्या संसदेने जनतेच्या भावनांचा आदर करून राष्ट्राध्यक्ष होराशियो कार्टेस यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. देशाच्या राज्यघटनेनुसार कोणताही व्यक्ती केवळ एक वर्ष राष्ट्राध्यक्ष पदावर राहू शकते.  
होराशियो पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी संसदेत संविधानात दुरुस्तीची मागणी केली होती. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने बुधवारी यासंबंधीचा प्रस्ताव नामंजूर केला. संसदेत अशा प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर देशभरात निदर्शने सुरू झाली होती. या दरम्यान हिंसाचार झाला होता. देशभरात मात्र होराशियाे यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास परवानगी दिली जाऊ नये, अशी भावना जनमानसात दिसून आली. जन आक्रोश असतानाही सिनेटने हा प्रस्ताव गुपचूप पारित केला होता. त्यामुळे आणखीनच संतप्त झालेल्या लोकांनी ३१ मार्च रोजी संसदेच्या इमारतीला आग लावली होती.  देशात राष्ट्राध्यक्ष पदासाठी पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. होराशियो यांनी हिंसाचार भडकल्यानंतर गेल्या आठवड्यात आपली भूमिका मांडली होती. घटना दुरुस्तीला मंजुरी मिळाली तरी आता राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.  
 
शीतपेय व तंबाखू कंपनीचे मालक राष्ट्राध्यक्ष होराशियाे यांच्या मालकीच्या शीतपेय व तंबाखू कंपन्या आहेत. त्यांनी २०१३ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली होती.  
 
का झाला जनक्षोभ?  
पॅराग्वेने गेल्या ३५ वर्षांपासून हुकूमशाही पाहिली आहे. १९८९ मध्ये देशाने हुकूमशाहीच्या बेड्यांतून सुटका करून घेतली. १९९२ मध्ये नवीन राज्यघटना तयार करण्यात आली होती. भविष्यात हुकूमशाही पुन्हा येऊन म्हणून  राष्ट्राध्यक्ष पदासाठी एक कार्यकाळ असेल, अशी तरतूद राज्यघटनेत करण्यात आली होती. परंतु त्याला हरताळ फासून विद्यमान राष्ट्राध्यक्षांनी संविधान दुरुस्तीचा खटाटोप केला होता. त्यामुळे जनतेत संताप उसळला.  
 
काय होईल परिणाम?
संसदेने नकार दिल्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष होराशियो दुसऱ्यांदा निवडणूक लढवू शकणार नाहीत. डाव्या पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष फर्नांडो लुगो हे देखील दुसऱ्यांदा इच्छुक होते. परंतु त्यांनाही आता निवडणूक लढवता येणार नाही. लुगो यांना २०१२ मध्ये संसदेने पदावरून हटवले. 
 
गुंतवणूकदारांची पसंती होराशियो यांना राष्ट्राध्यक्ष होराशियो गुंतवणूकदारांची पसंत आहेत. त्यांच्या आयकर धोरणाचे समर्थक आहेत. त्यांच्या कार्यकाळात देशाने मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. त्यांना पुन्हा संधी मिळावी, अशी  उद्योग घराण्यांची इच्छा आहे.
 
अमेरिका-दक्षिण कोरिया करणार संयुक्त सराव-
 
- दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्या संयुक्त कवायतीत ही युद्धनौका सहभागी होणार आहे. 
- १५० टॉम हॉक क्षेपणास्त्रे असलेली यूएसएस मिशिगन ही अणुपाणबुडी बुसान येथे दाखल झाली असून, उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याची त्यांची क्षमता आहे. 
- अमेरिकेने खोड काढल्यास त्याचे वाईट परिणाम होतील असे उत्तर कोरियातील रोडाँग सिनमून या सत्ताधारी वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या मुखपत्राने म्हटले आहे.
 
चीन-रशियाची महत्त्वाची भूमिका-
 
- जपान, दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्या दूतांची बठक टोकियोत झाली असून, त्यांनी उत्तर कोरियाने प्रक्षोभक कृत्य केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. 
- चीन व रशिया या देशांची भूमिका उत्तर कोरियाचे मन वळण्यात महत्त्वाची ठरू शकते, असे दक्षिण कोरियाचे दूत किम हाँग यून यांनी सांगितले.
 
अमेरिकेकडून दक्षिण कोरियाला क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा-
 
- उत्तर कोरियाच्या आण्विक महत्त्वाकांक्षा वाढलेल्या असतानाच चीनला नकोशी असलेली क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा अमेरिकेने दक्षिण कोरियाला पुरवण्यास सुरुवात केली आहे. 
- एकीकडे उत्तर कोरियाला प्रक्षोभक कारवाया थांबवण्यास चीनने सांगावे अशी अपेक्षा अमेरिकेने ठेवली असतानाच दुसरीकडे क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा दक्षिण कोरियात तैनात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
- टर्मिनल हाय अल्टिटय़ूड एरिया डिफेन्स (थाड) यंत्रणा दक्षिण कोरियात बसवण्याचे काही दिवसांपूर्वीच ठरले होते व त्याचा उद्देश अण्वस्त्र सज्ज उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव हा आहे. 
- चीनला मात्र यात त्यांची आंतरखंडीय क्षेपणास्त्र क्षमता कमी होण्याची भीती वाटत असून त्यामुळे प्रादेशिक सुरक्षा समतोल ढळेल अशी शक्यताही चीनने व्यक्त केली आहे. 
- चीनने या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेच्या प्रस्तावानंतर दक्षिण कोरियाविरोधात काही आर्थिक र्निबध लादले असून पर्यटकांच्या गटांनाही बंदी घातली आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, उत्तर कोरियाने कसे केले शक्तीप्रदर्शन...
बातम्या आणखी आहेत...