आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे उत्तर कोरियाचा क्रूर हुकुमशहा, आतापर्यंत दिलाय 100 जणांना मृत्युदंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाचा हा सर्वोच्च नेता किम जोंग ऊन उत्तर कोरियाच्या इतिहासात सर्वात क्रूर हुकुमशहा बनला आहे. - Divya Marathi
उत्तर कोरियाचा हा सर्वोच्च नेता किम जोंग ऊन उत्तर कोरियाच्या इतिहासात सर्वात क्रूर हुकुमशहा बनला आहे.
इंटरनॅशनल डस्क- उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने त्याचा साव‍त्र भाऊ किम जोंग नाम (45) यांची गुप्तचर संस्थेच्या मदतीने मलेशियात‍ हत्या केल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या न्यूज एजन्सीने म्हटले आहे. किम जोंग उनच्या या सावत्र भावाला दोन महिलांनी विषारी सुई टोचून मारल्याचे समोर येत आहे. महिला मारेकर्‍यांनी किमच्या भावाच्या सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेऊन त्याची हत्या केल्याचे दक्षिण कोरिया सरकारने म्हटले आहे. 
 
उत्तर कोरियाचा हा सर्वोच्च नेता किम जोंग ऊन उत्तर कोरियाच्या इतिहासात सर्वात क्रूर हुकुमशहा बनला आहे. 2011 मध्‍ये देशाची सत्ता हातात आल्यानंतर त्यांने आतापर्यंत किमान 100 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्याचे वडील किम जोंग इलने 1994 ते 2011 पर्यंत आपल्या शासन कार्यकाळात फक्त 11 लोकांना फासावर लटकवले होते. या तुलनेत ऊन त्याच्या पित्यापेक्षाही क्रूर आहे. त्याला आज्ञा न पाळणारी लोक आवडत नाही.
 
जाणून घ्‍या 2011 पासून आतापर्यंत कोणत्या खास लोकांना ऊनने मृत्यूदंड सुनावले...
बातम्या आणखी आहेत...