आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतकी मॉडर्न आहे सौदी अरबची प्रिन्सेस, नाही घालत बुर्खा- हिजाब ड्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबची प्रिन्सेस अमीराह अल तावील - Divya Marathi
सौदी अरबची प्रिन्सेस अमीराह अल तावील
सौदी अरबमधील महिलांना अनेक बंधने घातली गेली आहेत. मात्र, या देशातील राजकुमारीने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की, जर महिलांनी ठरवले तर असले प्रतिगामी बंधने झुगारून त्या पुढचा प्रवास सहज करू शकतात. सध्या सोशल मीडियात सौदीतील राजकुमारीचे फोटोज वायरल होत आहेत. नाही घालत हिजाब आणि बुर्खा....
- 33 वर्षाची अमीराह अल तावील आपल्या देशाची पहिली महिला आहे जिने लांब, सुटसुटीत कपडे घालण्याऐवजी युरोपियन कल्चरमधील कपडे घालणे सुरु केले आहे.
- बुर्खा अथवा हिजाबचे कपडे घालून बाहेर जाण्याचा आदेश तिने धुडकावून लावला. ती इतके मॉडर्न कपडे घालते की त्यातही ती ट्रॅडिशनल टच स्पष्ट दिसतो.

जगभर फिरल्याने कक्षा रूंदावल्या-
- अमीराह त्या सर्व महिलांसाठी प्रेरणा आहे ज्या संकटाशी लढताहेत व ज्यांना पुढे जायचे आहे.
-तिने फक्त सौदात नव्हे तर जगभर फिरून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. अमीराह आतापर्यंत 70 पेक्षा अधिक देशात फिरून आली आहे.
अनेक चॅरिटी आर्गेनायजेशनशी जोडली-
- जगातील कोणत्याही देशात जेव्हा काही संकट ओढवते तेव्हा अमीराह तेथे पोहचते व लोकांना मदत करते.
- तिने अफ्रिकेत रस्त्यावर राहणा-या लोकांसाठी घरे बांधून दिली. पाकिस्तानात आलेल्या महापूरात घरे नष्ट झालेल्या लोकांना मदत केली.
- सोमालियातील गरीब लोकांना अमीराह कायमच मदत करत आली आहे.
महिलांसाठी बनलेय प्रेरणा
- सौदी अरबमधील महिलांवर अनेक बंधने आहेत. मात्र अमीराह ने फक्त आपल्याच पद्धतीनेच स्वत:चे जीवन जगत नाही तर इतर महिलांनाही पुढे येण्यास आवाहन करते, मदत करते.
- अमीराह स्वत:च कार चालवते व दुस-या महिलांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी झगडते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सौदी अरबच्या या प्रिन्सेसचे आणखी काही फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...