आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 48 कोटींना अमेरिकेने रशियाकडून खरेदी केले हे राज्य, यामुळेच US आज समृद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेने अलास्काला 1959 मध्ये अमेरिकेचे 49 वे राज्य घोषित केले होते. - Divya Marathi
अमेरिकेने अलास्काला 1959 मध्ये अमेरिकेचे 49 वे राज्य घोषित केले होते.
इंटरनॅशनल डेस्क- कधी काळी रशियाचा स्वर्ग म्हटला जाणा-या अलास्का प्रांत आता अमेरिकेचा भाग आहे. 30 मार्च 1867 रोजी अमेरिकेने सेव्हियत यूनियनकडून अलास्का प्रांत खरेदी केला होता. आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल की, अमेरिकेने अलास्का प्रांत केवळ 72 लाख डॉलर (45 कोटी 81 लाख रुपये) मध्ये खरेदी केला होता. आपल्या माहितीसाठी हे की, अलास्का प्रांतात भरपूर तेल साठे, गोल्ड व डायमंडच्या खाणी असल्यामुळे याला आता अमेरिकेचा ‘खजाना’ म्हटले जाते. रशियाला त्या व्यवहाराचा आजही खूप त्रास होतो. अशा पद्धतीने विकले होते अलास्का राज्य...
 
- अलास्का विकण्याचा विचार सेव्हियत यूनियनचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री अलेक्जेंडर मिखाइलोविच गोर्काकोव यांच्या मनात आला.
- सांगितले जाते की, अमेरिकेचे तत्कालीन प्रेसिडेंट अॅंड्यू जॉन्सन यांनी गोर्काकोव यांना राजी केले होते. यानंतर गोर्काकोवने रशियाचे जार अलेक्जेंडर-II यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला व त्यांनी अलास्का विकायला परवानगी दिली. 
- मात्र, रशियाची जनता याविरोधात होती. असे असूनही जार अलेक्जेंडरने 30 मार्च 1867 रोजी अलास्का विकण्याच्या करारावर सह्या केल्या. 
- एवढेच नव्हे तर, जेव्हा रशियाने वर्ष 2014 मध्ये क्रिमियावर ताबा मिळवला होता. त्यानंतर रशियाचा फेमस सिंगर निकोलेए व्याचेस्लावोविच याने एक गाणे लिहले, गायले होते. ज्यात म्हटले होते की, रशियन प्रेसिडेंट व्लादिमिर पुतिन एक दिवस अमेरिकेकडून अलास्का हिसकावून घेतील.
 
अलास्का विकण्याची मजबूरी-
 
- खरं तर, रशियन साम्राज्य म्हणजेच सेव्हियत यूनियनला भीती होती की, युद्ध झाल्यास ब्रिटनच्या मदतीने अमेरिका यावर कब्जा करेल. 
- त्यावेळी सेव्हियत यूनियनची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. तसेच अलास्का सेव्हियत यूनियनसाठी फार काही महत्त्वाचा वाटत नव्हता.
- यासोबतच दुसरे मोठे कारण होते ते म्हणजे रशियाची बॉर्डर सुरक्षित ठेवणे. कारण अलास्का इतका विशाल प्रांत आहे की, तेथे मोठ्या प्रमाणात लष्कर ठेवणे अवघड होते.
 
जारच्या हत्येचे कारण सुद्धा अलास्काच!-
 
- सेव्हियत यूनियनचा जार अलेक्जेंडरचा जन्म 7 सप्टेंबर, 1815 रोजी रशियात झाला होता. 
- तो 2 मार्च, 1855 रोजी तो सेव्हियत यूनियनचा जार बनला होता.
- रशियन इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, जारच्या मृत्यूचे खरे कारण अलास्का हेच होते. कारण, 1867 नंतर त्याच्यावर तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले. मात्र त्याचा प्रत्येक वेळी जीव वाचला. 
- अखेर 13 मार्च, 1981 रोजी सेंट पीटर्सबर्गमधील विंटर पॅलेसमध्ये ईवान एमेल्यानोव नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर बॉम्ब फेकून जारला ठार मारले होते.
- मात्र, रशियन साम्राज्याने हे कधीच मान्य केले नाही की, जारच्या हत्येचे कारण अलास्का विकणे हे होते.
 
अलास्कातून अमेरिकेला मोठे उत्पन्न-
 
- सुमारे 1,717,856 किमी परिघात पसरलेला अलास्का प्रांत अमेरिकेला एखाद्या खजान्यापेक्षा कमी नाही. 
- येथे मोठ्या प्रमाणात नॅचरल गॅस आणि पेट्रोलियम पदार्थ आहेत. येथे अनेक ऑईल फॅक्ट्रीज आहेत. फक्त अलास्कामधून अमेरिकेला देशाच्या गरजेच्या 20 टक्के पेट्रोल मिळते. 
- 1950 च्या दशकात अमेरिकेने अलास्कात गोल्ड आणि हिरे खाणीचा शोध लावला. येथून आता मोठ्या प्रमाणात सोने मिळते.
- याशिवाय फिशिंग आणि टूरिजममधून अमेरिकेला येथून मोठा हातभार लागतो. येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने टूरिस्ट येतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अलास्का संबंधित इतर रोचक माहिती....
बातम्या आणखी आहेत...