आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकचाच हात, चीनने केले पहिल्यांदाच मान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांत पाकिस्तानचाच हात होता, हे चीनने पहिल्यांदाच मान्य केले आहे. चीनच्या सीसीटीव्ही-९ या सरकारी चॅनेलवर एक डॉक्युमेंट्री प्रसारित करण्यात आली. तीत मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांत लष्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तानमध्ये असलेले त्यांचे हँडलर्स यांची भूमिका दाखवण्यात आली आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या या हल्ल्यात १६४ जण ठार झाले होते.

या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतच नव्हे तर संपूर्ण जगालाच हादरा बसला होता. भारताने अनेक वेळा पुरावे देऊनही या हल्ल्यांत आपली काही भूमिका आहे हे पाकिस्तान नाकारत होता. चीनही आतापर्यंत पाकिस्तानचीच री ओढत होता. फण अलीकडेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या चीन दौऱ्यापूर्वी शांघाय टीव्हीने एक डॉक्युमेंट्री दाखवली. तीत लष्कर-ए-तैयबाने २६/११ च्या हल्ल्याचा कट कसा आखला आणि त्याची अंमलबजावणी कशी केली हे दाखवण्यात आले. अजमल कसाबने आपली भूमिका कशी स्वीकारली हेही डॉक्युमेंट्रीत दाखवण्यात आले. आता हीच डॉक्युमेंट्री चीनच्या सीसीटीव्ही-९ या सरकारी चॅनेलवर दाखवण्यात आली आहे.
पुढे वाचा...
> चीनचे धोरण बदलतेय?
> चीनला सतावतेय प्रतिमेची चिंता
बातम्या आणखी आहेत...