आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनी अध्यक्ष जिनपिंग म्हणाले- 'पाकिस्तान दौरा म्हणजे सख्ख्या भावाच्या घरी जाण्यासारखे'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग आजपासून (सोमवार) दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर जात आहेत. जिनपिंग यांनी या दौऱ्याआधी मी माझ्या 'सख्ख्या भावा'च्या घरी जात असल्याचा आनंद होत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी माध्यमात लिहिलेल्या लेखात त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. चीनी अध्यक्षांच्या पाकिस्तान भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात विकासासाठी सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.
जिनपिंग यांनी पाकिस्तान आपला खास मित्र असल्याचे लेखात म्हटले आहे. पाकिस्तानसोबत द्विपक्षीय सहकार्याचा आराखडा ठरवण्यासाठी, चीन-पाकिस्तान दरम्यानच्या 46 अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या आर्थिक मार्गात भरीव प्रगती करण्यासाठी, तसेच इतर क्षेत्रांमध्ये वास्तविक सहकार्य करण्यासाठी पाकिस्तानी नेत्यांसोबत काम करण्याची मी वाट पाहात आहे, असे चिनी अध्यक्षांनी म्हटले आहे. जिनपिेंग यांनी म्हटले आहे, की चीनला आपल्या शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत.
पाकिस्तानी माध्यमात जिनपिंग यांच्या स्वाक्षरीसह प्रकाशित लेखात म्हटले आहे, 'पाकिस्तानचा हा माझा पहिला दौरा आहे. पण मला असे वाटत आहे, की मी माझ्या भावाच्या घरी जात आहे. या दौऱ्यात दरम्यान मी पाकिस्तानी नेत्यांना भेटणार आहे. त्यांना भेटून विकासाच्या संधी शोधल्या जातील.' 2015 मधील चीनी अध्यक्षांचा हा पहिला परदेश दौरा आहे. जिनपिंग सोमवार, मंगळवार हे दोन दिवस पाकिस्तानात राहातील आणि नंतर इंडोनेशियातील बांडुंग परिषदेला हजर होण्यासाठी रवाना होतील.