आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 दिवसांत तिसऱ्यांदा चीन बॅकफुटवर, या प्रमुख कारणांमुळे नरम पडला ड्रॅगन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/बीजिंग - ब्रिक्स समिटमध्ये मंगळवारी भारताला मोठे यश मिळाले आहे. पीएम मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यात चीनने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंचशील करारानुसार, काम करण्याची तयारी दर्शवली. सोमवारी जारी झालेल्या संयुक्त जाहिरनाम्यात पाकिस्तानच्या लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद अशा दहशतवादी संघटनांपासून जगाला धोका असल्याचे मान्य करण्यात आले. गेल्या 5 दिवसांत चीनला आपल्या भूमिकेवर 3 वेळा माघार घ्यावी लागली आहे. विशेष म्हणजे, 72 दिवसांपासून चाललेला सीमावाद 28 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला. वाद सुरू असताना चीन सरकार आणि माध्यमांकडून दररोज धमक्या दिल्या जात होत्या.
 

1) 31 ऑगस्ट: BRICS प्लस बनवण्यापासून माघार
BRICS मध्ये कुणाला समाविष्ट करणार होता चीन?

- थायलँड, इजिप्त, ताजिकिस्तान, मेक्सिको आणि गिनी 5 कॉन्टिनेंट (खंडांचे) प्रतिनिधित्व करतात. हे चीनचे महत्वाकांक्षी प्रकल्प वन बेल्ट-वन रोड (OBOR) मध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात. या प्रकल्पात जास्तीत-जास्त देश समाविष्ट करून चीन आपला ट्रांसपोर्ट नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे. 
 
 
चीनकडून कसोटीचे प्रयत्न का?
- BIMSTEC (बे ऑफ बंगाल इनीशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अॅन्ड इकोनॉमिक) चे गेल्या वर्षी गोव्यात संमेलन पार पडले. यात भारतासह, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलँड, भूतान आणि नेपाळ सहभागी झाले होते. 
- चीनच्या म्हणण्यानुसार, रशिया, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिकेला सुद्धा यात समाविष्ट करावे. कारण, ते ब्रिक्सचे सदस्य आहेत. 
 
 
का घ्यावी लागली माघार?
- 31 ऑगस्ट रोजी चीनला ब्रिक्स प्लस बनवण्याची योजना मागे घ्यावी लागली. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका या पाच देशांचा समावेश आहे. 
- चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी संकेत दिले होते, की ब्रिक्समध्ये सदस्यांच्या व्यतीरिक्त इतरांना सहभागी करण्याचा विचार केला जात नाही. 
- त्याच दिवशी चीनचे परराष्ट्र प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले, "आमच्या देशाची इतर अनेक देशांसोबत चर्चासत्र सुरू आहे. वेळ मिळाल्यास आम्ही त्यांचा विचार करणार आहोत."
 

2) 4 सप्टेंबर: भारताने पाकचा मुद्दा उचलू नये अशी होती चीनची इच्छा
- चीनने भारताला इशारा दिला होता, की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा उल्लेख ब्रिक्स संमेलनात उचलू नये. 
- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते, दहशतवादावर पाकिस्तानच्या भूमिकेवर भारताकडून काही चिंता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, हा मुद्दा उचलण्यासाठी ब्रिक्स योग्य व्यासपीठ नाही. 
 
 
भारताने काय केले?
- भारताच्या दबावामुळेच ब्रिक्सच्या संयुक्त जाहिरनाम्यात ISIS, तालिबान, अलकायदा, ईस्टर्न तुर्किस्तान इस्लामिक मूवमेंट, इस्लामिक मूवमेंट ऑफ उज्बेकिस्तान, हक्कानी नेटवर्क, जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि हिज्ब-उत-तहरीरचा उल्लेख करण्यात आला. 
- यापैकी बहुतांश दहशतवादी संघटना पाकिस्तानातून ऑपरेट केल्या जातात. दहशतवादाच्या मुद्द्यावर एकटा पडलेला चीन सुद्धा आपला मित्र पाकिस्तानच्या विरोधात उभा होण्यासाठी विवश झाला.
- जैश आणि लश्करचे नाव त्यांच्या हिंसक कारवायांमुळे जाहिरनाम्यात आले आहे असे चीनला सुद्धा मान्य करावे लागले आहे. 
 

3) 5 सप्टेंबरः चीनला आठवला नेहरूंचा पंचशील सिद्धांत
नेमके काय झाले?

शियामेन येथे नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. सिक्किमच्या डोकलाम परिसरात झालेल्या वादानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. यावेळी जिनपिंग म्हणाले, "चीन पंचशीलच्या 5 सिद्धांतांवर भारतासोबत काम करण्यास तयार आहे."
 

काय आहे याचा अर्थ
- हा चीनच्या भूमिकेत आलेल्या नरमाइचे लक्षण आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून डोकलामच्या मुद्द्यावर दररोज धमक्या देणाऱ्या चीनचे राष्ट्राध्यक्ष पीएम मोदींना भेटले. त्यांनी पंचशील करारानुसार, संबंध पुढे नेणार असे सांगितले आहे. 
- पंचशीलचा अर्थ - एक-मेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर-सन्मान करणे, दूसऱ्या देशातील अंतर्गत मुद्द्यांमध्ये दखल न देणे, एकमेकांवर हल्ला न करणे, सहकार्य वाढवणे, एक-मेकांच्या हितांना प्रोत्साहित करणे आणि शांतता व सहकार्य भावनेवर धोरण अवलंबणे होय.
बातम्या आणखी आहेत...