आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये "पीके'चा १०३ कोटी गल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या बहुचर्चित पीके चित्रपटाने चीनमध्ये विक्रमी १० कोटी युआनचा (१०३ कोटी ३४ लाख रु.) गल्ला केला आहे. यानिमित्ताने चीनमधील चित्रपटक्षेत्रात तीन अंकी आकडा पार करणारा पीके पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
पीकेची चिनी आवृत्ती २२ मे रोजी प्रदर्शित झाली होती. यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे रविवारपर्यंत १०० दशलक्ष युआनचा गल्ला जमा करण्यात चित्रपट यशस्वी ठरल्याचे भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देणाऱ्या स्ट्रॅटेजिक अलायन्स फर्मचे भागीदार प्रसाद शेट्टी यांनी सांगितले. पीकेला चीनमध्ये आश्चर्यकारक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाला अमेरिका आणि कॅनडामध्येही यश मिळाले.
टूमाॅरो लँडपेक्षा प्रेक्षकांची अधिक पसंती
चीनमध्येयाच दरम्यान प्रदर्शित झालेला हॉलीवूड चित्रपट "टूमाॅरो लँड'पेक्षाही पीकेने चांगली कामगिरी केल्याचे शेट्टी यांनी सांगितले. चित्रपटाचे यश पाहता पीकेला अमेरिका कॅनडापेक्षाही चिनी प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. चिनी चित्रपट उद्योग भारतीय चित्रपटांना गांभीर्याने घेत असल्याचे यातून दिसते, असे शेट्टी यांनी सांगितले. ते म्हणाले, पीकेचे यश दोन्ही देशांतील चित्रपट उद्योगासाठी उत्साहवर्धक आहे. दोन्ही देशांमध्ये स्थानिक निर्मितीला प्रोत्साहन देणारा करार असून यामुळे निर्मात्यांना संयुक्त बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
५००० चित्रपटगृहांत प्रदर्शित
अन्यभारतीय चित्रपटापेक्षा पीकेचे चीनमधील ५००० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शन झाले. चित्रपटाला मिळणाऱ्या अपेक्षित प्रतिसादामुळे येत्या काही आठवड्यांपर्यंत तो आणखी चालेल. एका सामान्य सामाजिक मुद्द्याला चीनमध्ये प्रतिसाद मिळतो हे यातून स्पष्ट होते. पीकेमध्ये अंधश्रद्धेवर विनोदी पद्धतीने प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. आमिर खानचा थ्री इडियट्स चित्रपटही चीनमध्ये लोकप्रिय ठरला होता. बॉलीवूडच्या विनोदीपटाची निर्मिती चिनी चित्रपट उद्योगाने शिकली पाहिजेत,असे येथील चित्रपट समीक्षकांनी म्हटले आहे.