आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Modi China Visit Know About Xian City Hometown Of Xi Jinping

हे आहे चिनी राष्‍ट्रपतींचे मूळ शहर, आज पंतप्रधान मोदी करणार दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या शियान शहरातील बेल टॉवर
शियान - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांचा चीन दौरा गुरुवारपासून शियान शहरातून सुरु झाला आहे. शियान चीनची शांक्सी प्रांताची राजधानी आणि राष्‍ट्रपती शी जिनपिंग यांचे मूळ शहर आहे. जगातील चार प्रमुख प्राचीन शहरांपैकी एक शहर आहे. शियानमध्‍ये चीनचा इस्लामशी परिचय झाला होता. येथे आजही मोठ्याप्रमाणावर मुस्लिम राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी टेराकोटा वॉरियर्स संग्रहालय, साऊथ सिटी वॉल, द शिंग शान मंदिर आणि इतर स्थळांना भेटी दिल्या. आम्ही तुम्हाला शियान शहरातील काही खास ठिकाणांविषयी सांगणार आहोत.
बेल टॉवर
हा शियान येथील एक पारंपरिक आरामदायी इमारत आहे. प्राचीन काळी ते राजधानीचे केंद्र होते. लाकडाच्या या टॉवरची लांबी 36 मीटर आहे. ते 35.5 मीटर लांबीचे विटांच्या एका स्तंभावर उभा आहे. या टॉवरची निर्मिती 1384 मध्‍ये सम्राट झू युआनझांग याने केली होती.

पुढील स्लाइड्सवर जाणून, जिनपिंग यांच्या मूळ शहराच्या खास ठिकाणांव‍िषयी...