आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुण-दोषांच्या आधारे पाठिंबा द्या, एनएसजी प्रवेशासाठी मोदींची जिनपिंगकडे मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताश्कंद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतली. एनएसजी अर्थात अणुपुरवठादार गटात भारताला सदस्यत्व देण्यासाठी त्यांनी जिनपिंग यांच्याकडे पाठिंबा मागितला. चीनने आतापर्यंत त्यास विरोध दर्शवला आहे. भारताच्या अर्जावर चीनने नि:पक्षपणे व गुण-दोषांच्या आधारे समर्थन द्यावे, अशी मागणी मोदींनी राष्ट्राध्यक्षांकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोदी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर जिनपिंग यांची देहबोली सकारात्मक दिसून आली. परंतु आता दोन्ही नेत्यांच्या बैठकीचा खरा परिणाम शुक्रवारी सेऊलमध्ये एनएसजीच्या महत्त्वाच्या बैठकीतून दिसून येणार आहे. मोदी व जिनपिंग गुरुवारी शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीआे) बैठकीत सहभागी होण्यासाठी ताश्कंदमध्ये पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली.

परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप उभय नेत्यांच्या बैठकीनंतर म्हणाले, एससीआेमध्ये भारताला देण्यात आलेल्या सदस्यत्वाचे जिनपिंग यांनी स्वागत केले. भारतामुळे संघटनेला अधिक बळकटी मिळेल. त्याबद्दल मोदी यांनी चिनी राष्ट्राध्यक्षांचे खूप आभार व्यक्त केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एनएसजीच्या विषयपत्रिकेवरील भारताच्या सदस्यत्वाच्या अर्जावर चर्चा केली.

उझ्बेक पंतप्रधानांकडून स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी ताश्कंदमध्ये आगमन झाले. विमानतळावर उझ्बेकिस्तानचे पंतप्रधान शवकत मिरोमोनोविच मीरजिआेएव यांनी स्वागत केले. मोदी दोन दिवस एससीआेच्या शिखर बैठकीत सहभागी होतील. ताश्कंदमध्ये सकारात्मक चित्र दिसू शकेल, असे मोदी यांनी दिल्लीतून निघण्यापूर्वी म्हटले होते.

२२ देशांचे समर्थन
एनएसजीच्या ४८ पैकी २२ सदस्य देशांनी भारताला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. अमेरिका व फ्रान्सनेही सदस्य देशांना भारताच्या सदस्यत्वाचे समर्थन करण्याचे आवाहनही केेले आहे.

चीनसह ६ देशांचा विरोध
चीनने भारताचा दावा अण्वस्त्र प्रसारबंदी कराराशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात एनपीटीमध्ये भारताला सवलत देण्यात आल्यास पाकिस्तानलाही तशी सवलत द्यावी लागेल. चीनशिवाय भारताला ब्राझील, तुर्की, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, दक्षिण आफ्रिकेने अर्जालाही विरोध केला. एकदा चीनने पाठिंबा दिल्यास इतर देशांचाही विरोध आपोआप मावळेल, असे भारताला वाटते.

पाकिस्तानने मानले आभार
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसैन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. हुसेन यांनी पाकिस्तानला एससीआेचे सदस्य बनवणे व एनएसजीमध्ये सदस्यत्वासाठी पाठिंबा देण्यासाठी जिनपिंग यांचे आभार व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...