आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये पोलिस ठाण्यांतील अत्याचार टाळण्यासाठी चौकशीचे रेकॉर्डिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाय - पोलिसांकडून केली जाणारी बळजबरी आणि संशयितांच्या मानवाधिकाराच्या संरक्षण करण्याच्या उद्देशाने चीनमध्ये आता प्रत्येक पोलिस चौकशीची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे.
चीनमध्ये पोलिसांकडून नागरिकांना कोणत्याही गुन्ह्यात बेकायदेशीररीत्या अडकवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याने त्यास नागरिकांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळेच येथील सरकारने आता लोकांच्या मानवाधिकाराचे हनन होऊ नये याकडे लक्ष घातले असून जनसुरक्षा मंत्रालयाने रेकॉर्डिंगसंबंधित आदेश जारी केले आहेत.
चुकीच्या शिक्षेची नुकसान भरपाई फाशीनंतर

पोलिसांच्या चुकीमुळे अनेक निष्पापांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका युवकाच्या पालकांना मंगोलियाच्या न्यायालयाने नुकसान भरपाई मिळवून दिली. या १८ वर्षीय युवकाला बलात्काराच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली. मात्र, त्याने हा गुन्हा केला नसल्याचे फाशी दिल्यानंतर सिद्ध झाले.
अन्य एका प्रकरणात एका हॉटेल मालकाला बालकांना विषारी भोजन दिल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने मृत्युदंड सुनावला होता. यादरम्यान या मालकास तुरुंगात पोलिसांनी भरपूर यातनाही देण्यात आल्या. मात्र, नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली.
माजी अधिकाऱ्यास १९ वर्षांचा तुरुंगवास

शांघायच्या स्थानिक न्यायालयाने आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाचे माजी उपसंचालक हुआंग फेंगपिन यांना १९ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. औषधी कंपन्यांकडून ३० लाख युआन (सुमारे २.९९ कोटी) रोख आणि सोने घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता.