चीन वेगाने प्रगती करत आहे. मात्र सर्व विकास कुठे ना कुठे माणसाच्या जीवावर बेतत आहे. येथील लोकसंख्या धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. नोव्हेंबर 2013 मध्ये चीनच्या जियांग्सू प्रांतात आठ वर्षांच्या मुलीला फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले तेव्हा डॉक्टरांसाठी प्रदूषण व मुलीला झालेला कॅन्सर संबंध जोडणे अवघड गेले होते. धुरामुळे झाला कॅन्सर...
डॉक्टर म्हणाले, की कॅन्सर कदाचित गाड्यांमधून निघणा-या धुराच्या संपर्कात आल्याने होतो. त्यावेळी ही मुलगी देशातील सर्वात कमी वयाची कॅन्सर रुग्ण होती. ब्रिटन येथील छायाचित्रकार सॉविद दत्ता यांना एका अशाच मृत्यूच्या घटनेनंतर लोकसंख्याविषयी माहिती मिळाली. त्यावेळी ते बोर्डिंग शाळेत होते. दत्ता यांच्या मित्राच्या भावाचाही प्रदूषणामुळे कॅन्सर झाल्याने मृत्यू झाला होता. त्याने जेव्हा छायाचित्रण सुरु केले, तेव्हा या दुखद वेदना आपल्या कॅमे-या कैद करण्याचा विचार केला. त्यांनी त्यांचा प्रवास चीनमधील सर्वात प्रदूषित शहर शिंगताईपासून(2013 साली) सुरु केला. अनेक महिने चीनच्या 'कॅन्सर व्हिलेजेस'मध्ये प्रवास केला व त्या छायाचित्रांबरोबर परतले.
कॅन्सर व्हिलेज म्हणजे काय?
अशी ठिकाणे रसायनिक प्रकल्प व कोळशावर चालणा-या विद्युत केंद्राने घेरलेले असतात. त्याचा परिणाम येथे खूप असतो. या ठिकाणी माती व पाण्यात मोठ्या प्रमाणावर धातू मिसळ्याने प्रदूषित झाले आहे. चीनमध्ये गावचे गाव प्रदूषणामुळे आजारीने त्रस्त आहेत. प्रत्येक घरातील व्यक्ती कॅन्सरने किंवा श्वसनाच्या समस्याने त्रस्त आहे.
90 टक्के शहरेे विळख्यात
- चीनने 2014 मध्ये मान्य केले होते, की देशातील मोठी शहरे एअर क्वॉलिटी स्टँडर्ड राखण्यात अपयशी ठरले आहेत.
- देशाच्या 74 मधील 8 मोठे शहरे एअर क्लॉलिटीच्याबाबत नॅशनल स्टँडर्ड राखण्यात यशस्वी ठरले.
- या प्रदूषणाने चीनच्या कॅन्सर व्हिलेजेस म्हणजे प्रदूषित फॅक्टरींच्या आसपासच्या भागाकडे लक्ष वेधले आहे.
- या भागात वाढत्या प्रदूषणाने मृत्यूदर मोठ्याप्रमाणावर आहे. तज्जांनुसार, देशात अशी 450 गावे आहेत.
- चीनचे पर्यावरण संरक्षण मंत्रालयाने या गावांसाठी 'कॅन्सर व्हिलेजेस' शब्द 1998 पासून वापरायला सुरुवात केली.
- गेल्या 30 वर्षांमध्ये जुनाट पर्यावरण नियमांमुळे औद्योगिकीकरण, गाड्यांची संख्या आणि कॅन्सरने होणा-या मृत्यूंची संख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- देशातील 70 टक्के तलाव व नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)