Home »International »China» Poor Condition Iphone Factory Workers

स्वस्त iPhone चं गणित अन् कामगारांचा छळ, छोट्याशा रुममध्‍ये राहतात 12 जण

दिव्यमराठी वेब टीम | May 11, 2017, 12:18 PM IST

  • iPhone बनवणा-या कामगारांच्या हॉस्टेलचे हाल
इंटरनॅशनल डेस्क- आयफोन ५ एस आणि आयफोन एसई या दोन हँडसेटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत. या दरकपातीनंतर आयफोन ५ एस १५ हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. चायनीज स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 'अॅपल'नं हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच दिवाळीपर्यंत भारतात आपले स्वतंत्र ऑनलाइन स्टोअर सुरू करायचाही त्यांचा विचार आहे. त्याचाच भाग म्हणून आयफोन '५ एस'ची किंमत कमी करून तो फक्त ऑनलाइन विकण्याची चलाख खेळी ते करू शकतात. पुढील काळात आयफोन '५ एस'ची विक्री फक्त ऑनलाइन स्टोअरवरूनच करणार असल्याचे कंपनीने रिटेल विक्रेत्यांना सांगितले आहे. आयफोन ५ एस सध्या १८ हजार रुपयांना मिळतो. त्याची किंमत तीन हजाराने कमी होऊ शकते. वर्षभरापूर्वी बाजारात आलेला आयफोन एसईची किंमत २० हजारांवर येण्याची शक्यता आहे. या दोन्ही हँडसेटची स्क्रीन छोटी आहे, पण तीच त्यांची जमेची बाजू आहे.
अॅपल कंपनी चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी असे करत असल्याचे स्पष्ट असले तरी खुद्द अॅपलचा उत्पादन मात्र स्वस्तात व्हावं यासाठी कंपनी चीनमध्ये करते. चीनमध्ये उत्पादन करून तेथील कंपन्यांना टक्कर देण्यास अॅपल सज्ज झालं असलं तरी तेथील कामगारांची फारच करुण स्थिती आहे. अॅपलचे महागडे उत्पादन बनवणा-या कामगारांना शांघायमधील हॉस्टलमध्‍ये लहानशा रुममध्‍ये आठ ते बारा कामगारांना ठेवले जाते. प्रसाधानगृहाच्या भिंतींमधून पाणी टपकत असते. आंघोळीसाठी एकाच ठिकाणी २०-२० शॉवर एकापाठोपाठ लागले आहे. अशा रुममध्‍ये राहण्‍यासाठी कामगार १ हजार ५०० रुपये भाडे देतात.
६ हजार कामगार मात्र सुविधांचा आभाळ-
- तपासकर्त्यांनुसार, प्रत्येक मजल्यावर ६०२ लोकांची राहण्‍याची व्यवस्था करण्‍यात आली आहे. मात्र त्यांच्यासाठी ३० शौचालय, ३० शॉवर आणि ५० वॉश बेसिन आहे.
- आयफोन ५s चे उत्पादनावेळी ६ हजार कामगार या हॉस्टलमध्‍ये राहत होते.
- यातील हजारेक कामगार म्हणाले होते, की ते सुट्ट्यांनंतर परतणार आहेत.
- डेली मेलने याची एक्सक्लुझिव्ह फोटोज जारी करुन मेलला चार ब्लॉक्समध्‍ये जाण्‍याची संधी मिळाली होती.
- भिंतींवर ठिकठिकाणी कामाचे तासांदरम्यान ब्रेक घेण्‍याच्या वेळा लिहिल्या आहेत. सोबतच कामाचा पॅटर्नही लिहिला आहे.
- या इमारती फेब्रुवारीपर्यंत हॉस्टेलसाठी वापरली गेली.
- आता कामगारांना फॅक्ट्री कॅम्पसमधील इमारतीत शिफ्ट करण्‍यात आले आहे. अॅपल कंपनी याबाबत अनभिज्ञ आहे.
पेगाट्रॉन बनवते अॅपलचे फोन-
- या हॉस्टेलमध्‍ये स्थलांतरित कामगार राहतात. जी अॅपल कॉन्ट्रॅक्टर पेगाट्रॉनने भरती केले होते.
- पेगाट्रॉन तैवानमधील इलेक्ट्रॉनिक्सची प्रसिध्‍द कंपन्यांपैकी एक आहे.
- ती आपल्या कर्मचा-यांना आठवड्यातील सहा दिवस १२-१२ तास कामाच्या मोबदल्यात २४ हजार रुपये पगार म्हणून देते.
- यात काम करणारे बहुतेक लोक चीनमधील गरीब प्रांतात राहणारे आहेत.
- जगभरात विकले जाणारे आयफोन-६ अर्धी बॅच या कंपनीत तयार झाली आहे.
- २०१५ मधील बीबीसीच्या एका अहवालात पेगाट्रन कमगारांशी अमानुष पध्‍दतीने वर्तणूक करत असल्याचे सांगितले होते.
हे हॉस्टेल सुरक्षित नाही-
- मेन फॅक्ट्रीजवळ असलेल्या हॉस्टेलमध्‍ये राहणा-या २५ वर्षांच्या कामगाराने सांगितले, की येथे घाण आणि गर्दीपेक्षा मोठी समस्या सुरक्षेची आहे. सुरक्षा कर्मचा-यांचे येथे कोणतेही नियंत्रण नाही.
- वेगवेगळ्या प्रांतातून येथे भिन्न स्वभावाचे लोक येतात. अशा स्थितीत मौल्यवान वस्तूंची चोरी मोठ्या प्रमाणावर होते. एकदा एका कामगाराची पूर्ण पगार पहिल्याचे दिवशी गायब झाली होती.
- बॉस पैसे कमवण्‍यासाठी रोबोटप्रमाणे वापर करतात, असे एका दुस-या कामगाराने सांगितले.
पुढील स्लाईड्सवर पाहा, या हॉस्टेलची छायाचित्रे...

Next Article

Recommended